Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

आता बिनधास्त खरेदी करा Tata Nexon सह ‘ह्या’ शानदार कार्स; मस्त फीचर्ससह किंमत 15 लाखांपेक्षा कमी | Under 15 lakh SUVs

चला मग जाणून घेऊया भारतीय ऑटो बाजारात 20 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह कोणत्या कोणत्या एसयूव्ही कार्स उपलब्ध आहे.

0

Under 15 lakh SUVs : जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला आज या लेखात मस्त मस्त फीचर्स आणि बेस्ट मायलेजसह 15 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये येणाऱ्या एसयूव्ही कार्सची माहिती देणार आहोत .

ज्याच्या तुम्ही फायदा घेत तुमच्यासाठी एक मस्त एसयूव्ही कार अगदी कमी किमतीमध्ये घरी आणू शकतात. चला मग जाणून घेऊया भारतीय ऑटो बाजारात 15 लाखांपेक्षा कमी किमतीमध्ये भन्नाट फीचर्ससह कोणत्या कोणत्या एसयूव्ही कार्स उपलब्ध आहे.

Tata Nexon

या कारला 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते जे 120 PS पॉवर आणि 170 Nm जनरेट करते. तर 1.5 लिटर डिझेल इंजिन उपलब्ध आहे जे 115 PS आणि 260 Nm टॉर्क जनरेट करते. दोन्ही 6MT आणि 6AT गिअरबॉक्स पर्यायांसह आणले गेले आहेत. त्याची किंमत 7.80 लाख ते 14.50 लाख रुपयांपर्यंत आहे.

Mahindra Thar

Mahindra Thar RWD ला 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळते जे 117 PS पॉवर निर्माण करते, तर 4X4 व्हेरियंटमध्ये 130 PS पॉवर निर्माण करणारे 2.2-लिटर डिझेल मिळते. दोन्हीसोबत 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 150 पीएस पॉवर जनरेट करते. या कारची सुरुवातीची किंमत 10.55 लाख रुपयांपासून सुरू होते.

Kia Sonet

Kia Sonet ला तीन इंजिन पर्याय आहेत. 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (120 PS), 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन (83 PS) आणि 1.5-लीटर डिझेल युनिट (115 PS) पॉवर जनरेट करते. त्याची किंमत 7.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Mahindra XUV300

Mahindra XUV300 कारला तीन इंजिन पर्याय आहेत – 1.2 -लिटर टर्बो पेट्रोल मोटर (110पीएस), अधिक शक्तिशाली 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (130पीएस), आणि 1.5-लिटर डिझेल इंजिन (117 पीएस). त्याची किंमत रु.8.41 लाख पासून सुरू होते आणि रु.14.60 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Mahindra XUV300

Hyundai Creta

Hyundai Creta सध्या 1.5L NM पेट्रोल इंजिनसह येते. यात 1.5 लीटर डिझेल मोटर देण्यात आली आहे. दोन्ही समान 115 PS कमाल पॉवर निर्माण करतात. या कारची किंमत 10.87 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

MG Hector

ही कार भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त लक्झरी कार बनवते. MG Hector ला 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन 143 PS/250 Nm आणि 170 PS/350 Nm जनरेट करणारी 2.0-लीटर डिझेल मोटर मिळते. त्याची किंमत 15 लाख रुपये आहे, जी 18.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.