Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 20 Lakh Family Cars : लक्झरी फीचर्स आणि शानदार लूक! खरेदी करा या बेस्ट फॅमिली कार्स, किंमतही खूपच कमी…

मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटापासून महिंद्रापर्यंतच्या अनेक कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत.

0

Under 20 Lakh Family Cars : नवीन कार खरेदी करत असताना अनेकजण मोठ्या फॅमिलीसाठी ७ सीटर कारचा पर्याय निवडत असतात. तुमचेही बजेट २० लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही शानदार एसयूव्ही फॅमिली कार खरेदी करू शकता. टाटापासून महिंद्रापर्यंतच्या शक्तिशाली एसयूव्ही बाजारात उपलब्ध आहेत.

Toyota Innova crysta

टोयोटा कार उत्पादक कंपनीची Innova crysta ही कार तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये अनेक आकर्षक फीचर्स आणि शक्त्तीशाली इंजिन देण्यात आले आहे. या कारमध्ये 2.4 लीटर डिझेल इंजिन दिले आहे जे 148bhp पॉवर जनरेट करते.

हे इंजिन न्युअल ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 30 आठवड्यांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

टाटा हॅरियर

टाटा मोटर्सकडून त्यांची हॅरियर एसयूव्ही गेल्या काही वर्षांपूर्वी भारतीय ऑटो बाजारात सादर केली आहे. आता लवकरच हॅरियर फेसलिफ्ट मॉडेल देखील बाजारात सादर केले जाणार आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या हॅरियरची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.20 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 24.27 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमध्ये 2.0 लीटर Kryotec डिझेल इंजिन देण्यात आले आहे. कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.

टाटा सफारी

टाटा मोटर्सची सफारी ७ सीटर कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सफारी कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील लवकरच सादर केले जाणार आहे. सफारी कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.85 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 25.21 लाख रुपयांपर्यंत जाते. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे.

महिंद्रा XUV 400

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची XUV 400 एसयूव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या इलेक्ट्रिक कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय देण्यात आले आहेत. 34.5kWh युनिट आणि 39.4kWh बॅटरी पॅक असे हे बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. ही कार 456 किलोमीटर पर्यंतची रेंज देते.