Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 5 Lakh Cars : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कार खरेदीचे स्वप्न होईल पूर्ण! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा या शानदार कार…

कमी बजेट ग्राहकांसाठी कार खरेदी करण्याची चांगली संधी आहे. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर ५ लाखांच्या किमती शानदार कार घरी आणू शकता.

0

Under 5 Lakh Cars : अनेकजण कोणतीही नवीन वस्तू खरेदी करत असताना त्याअगोदर शुभ मुहूर्त पाहत असतात. तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी गणेश चतुर्थीचा मुहूर्त चांगला आहे. या दिवशी तुम्ही कमी बजेटमध्ये कार घरी आणू शकता.

कार खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र कारच्या किमती जास्त असल्याने अनेकांना त्या खरेदी करणे न परवडण्यासारखे झाले आहे. पण जर तुमचे बजेट ५ लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्ही बाजारातील शानदार फीचर्स कार घरी आणू शकता.

मारुती सुझुकीकडून नेहमीच कमी बजेट ग्राहकांचा विचार करता अनेक स्वस्त आणि दमदार मायलेज देणाऱ्या कार सादर केल्या आहेत. या कार स्वस्तात खरेदी करून तुम्ही घरी आणू शकता.

खालील कार ५ लाखाच्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

रेनॉल्ट क्विड

रेनॉल्ट कार उत्पादक कंपनीची क्विड कार देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. कारण ही कार अगदी कमी किमतीत उपलब्ध आहे. कारमध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये 0.8 लिटर सामान्य पेट्रोल मॅन्युअल आणि 1.0 लिटर सामान्य पेट्रोल मॅन्युअल जीन देण्यात आले आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5 लाख रुपये आहे. कारमध्ये 279 लीटर बूट स्पेस देखील देण्यात आली आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी नेहमीच त्यांच्या ग्राहकांना कमी बजेटमध्ये शानदार कार सादर करत असते. या कंपनीच्या कार ग्राहकांना परवडणाऱ्या ठरत आहेत. त्यामुळे मारुती सुझुकीच्या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मारुतीची एस-प्रेसो मायक्रो एसयूव्ही कार देखील तुमच्यासाठी चांगला प्रत्यय आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच कारमध्ये 270 लीटरची बूट स्पेसही देण्यात आली आहे.

मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकीची अल्टो K10 कार देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कमी बजेटमध्ये कार खरेदी करून घरी आणू शकता. 214 लीटरची बूट स्पेस देण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. तसेच या कंपनीच्या कार सर्वाधिक विक्री होत आहेत. सेलेरियो ही कार देखील कमी बजेट ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 5.37 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये 1.0 लीटर NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच कार सीएनजी पर्यायांमध्ये देखील ऑफर करण्यात येत आहे.