Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 8 Lakh Automatic Cars : 8 लाख रुपयांपेक्षा स्वस्त आहेत या 5 ऑटोमॅटिक कार, मारुती ते टाटापर्यंतच्या कारचा समावेश

कमी बजेटमध्ये ऑटोमॅटिक कार खरेदी करायची असेल तर भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकीपासून टाटापर्यंतच्या अनेक कार उपलब्ध आहेत.

0

Under 8 Lakh Automatic Cars : टाटा मोटर्स ते मारुती सुझुकीपर्यंतच्या अनेक ऑटोमॅटिक कार्स भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या कारच्या किमती देखील ८ लाख रुपयांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे कमी किमतीत तुम्ही देखील ऑटोमॅटिक कार खरेदी करू शकता.

सणासुदीच्या काळात तुम्हालाही ऑटोमॅटिक कार खरेदी करायची असेल तर ती बुक करू शकता. ८ लाखापेक्षा स्वस्त ऑटोमॅटिक कार्समध्ये अनेक शानदार फीचर्स देण्यात आले आहेत.

मारुती सुझुकी अल्टो K10 AMT

कमी बजेटमध्ये ऑटोमॅटिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मारुती सुझुकीची अल्टो K10 कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या कारमध्ये AMT गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहे. कराच्या ऑटोमॅटिक वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 5.61 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.90 लाखांपर्यंत जाते.

मारुती सुझुकी S-Presso AMT

मारुती सुझुकीच्या S-Presso कारमध्ये देखील ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. ही कार देखील अगदी कमी बजेटमध्ये उपलब्ध असल्याने तुमच्यासाठी उत्तम कार आहे. एस-प्रेसोच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.76 लाख ते 6.05 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट AMT

मारुती सुझुकीची स्विफ्ट सेडान कार देशातील नंबर वन सेडान कार आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारमध्ये ग्राहकांना ऑटोमॅटी गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. स्विफ्टच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 7.50 लाख ते 9.03 लाख रुपये आहे.

टाटा पंच AMT

टाटा मोटर्सकडून देखील कमी बजेट ग्राहकांना १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑटोमॅटिक कार्स उपलब्ध करून दिल्या आहेत. पंच मायक्रो एसयूव्ही कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. पंच AMT व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 7.50 लाख ते 10.10 लाख रुपये आहे.

टाटा टियागो AMT

टाटा मोटर्सच्या आणखी एका टियागो कारमध्ये AMT पर्याय देण्यात आला आहे. कारची किंमत देखील जास्त नसल्याने तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये ही कार खरेदी करू शकता. टियागोच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.95 लाख ते 7.80 लाख रुपये आहे.