Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Under 8 Lakh Cars In India : 8 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा टर्बो-पेट्रोल इंजिन स्टायलिश कार, मारुती ते महिंद्राच्या कारचा समावेश

शक्तीशाली इंजिन असलेली कमी बजेट कार खरेदी करायची असेल तर बाजारात महिंद्रा ते मारुतीच्या टर्बो-पेट्रोल इंजिन कार उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती देखील ८ लाखांपेक्षा कमी आहेत.

0

Under 8 Lakh Cars In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये कारच्या मागणीत वाढ झाली आहे. ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या स्वस्त आणि दमदार टर्बो-पेट्रोल इंजिन SUVs उपलब्ध आहेत. तुम्हालाही कमी बजेटमध्ये टर्बो-पेट्रोल इंजिन SUV खरेदी करायची असेल तर मारुती ते महिंद्राच्या कार उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स

मारुती सुझुकीच्या सर्वच कार ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. मारुती सुझुकीची Fronx एसयूव्ही कार तुमच्यासाठी उत्तम कारचा पर्याय आहे. कारमध्ये 1.2-लिटर, चार-सिलेंडर, NA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे 89bhp ची पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

तसेच कारमध्ये 1.0 लिटर, तीन सिलेंडर, टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले आहे जे 99 bhp ची पॉवर आणि 147 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारची एक्स शोरूम किंमत 7.47 लाख रुपयांपासून सुरु होते तर टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 13.14 लाख रुपयांपर्यंत जाते.

मारुती सुझुकी बलेनो

मारुती सुझुकी बलेनो ग्राहकांची आवडती प्रीमियम हॅचबॅक कार आहे. कारमध्ये 1.2 लिटर, चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 88bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.61 लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 9.88 लाख रुपयांपर्यंत जाते.

Kia Sonet

किआ कार कंपनीची Sonet एसयूव्ही कार देखील तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. ही ५ सीटर कार तीन इंजिन पर्यायासह सादर करण्यात आली आहे. 1.2 लिटर इंजिन, 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.79 लाख रुपयांपासून सुरू होते.

महिंद्रा XUV300

महिंद्रा कार कंपनीकडून XUV300 एसयूव्ही कारमध्ये देखील टर्बो-पेट्रोल इंजिन पर्याय दिल आहे. कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरु होते. कारमध्ये 1.2 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे.