Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 2 ADAS Cars : नवीन कार खरेदीचा प्लॅन आहे? तर जरा थांबा… लवकरच लॉन्च होणार या 2 ADAS कार्स, पहा यादी

देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या ADAS सुरक्षा फीचर्स असलेल्या कार सादर करण्यात आल्या आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना अजून नवीन ADAS फीचर्स असलेल्या कार ऑटो बाजारात दाखल होणार आहेत.

0

Upcoming 2 ADAS Cars : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या जबरदस्त सुरक्षा फीचर्स असलेल्या कार सध्या सादर करत आहेत. तसेच त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या कारमध्ये ADAS सुरक्षा फीचर्स देण्यात येत आहे.

आता पुढील वर्षी आणखी दोन कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या दोन नवीन एसयूव्ही कारमध्ये ADAS सुरक्षा फीचर्स देण्यात येणार आहे. तसेच याचबरोबर या एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देखील दिले जाणार आहेत.

महिंद्रा थार 5-डोअर

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या ऑफ रोडींग एसयूव्ही थार कारचे नवीन ५ डोअर व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे. २०२४ मध्ये Thar 5-Door कार लॉन्च केली जाणार आहे. ३ डोअर थार एसयूव्ही कारपेक्षा 5 डोअर केबिनमध्ये अधिक जागा देण्यात येणार आहे.

नवीन एसयूव्ही थार ५ डोअर कारमध्ये 2.2L टर्बो डिझेल किंवा 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन असेल. ५ डोअर थार 4×2 आणि 4×4 ड्राइव्हट्रेन पर्यायांसह ऑफर केली जाणायची शक्यता आहे.

Kia Sonet फेसलिफ्टमध्ये काय असेल खास?

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या सोनेट एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. आता या कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. किआ Sonet फेसलिफ्ट कारमध्ये ड्युअल-टोन अलॉय व्हील, शार्क-फिन अँटेना आणि हाय-माउंट स्टॉप लॅम्पचा नवीन सेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागील बाजूस LED इन्सर्टसह सर्व-नवीन LED टेल लॅम्प्स मिळण्याची शक्यता आहे.

सध्या किआ Sonet फेसलिफ्ट कारमध्ये 1.2-लिटर NA पेट्रोल, 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे तर आता किआ Sonet facelift एसयूव्ही कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देण्यात येईल. ही कार बाजारात लाँच होताच टाटा नेक्सन, मारुती सुझुकी फ्रंटएक्स, मारुती सुझुकी ब्रेझा, रेनॉल्ट किगर आणि महिंद्रा XUV300 शी स्पर्धा करते.