Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 5 Cars In India : भारतात लॉन्च होणार या 5 शक्तिशाली वेगवान कार्स! पहा यादी

देशातील ऑटो मार्केटमध्ये आणखी नवीन कार २०२४ मध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत. या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येणार आहेत. मारुतीपासून महिंद्रापासूनच्या कार लॉन्च होणार आहेत.

0

Upcoming 5 Cars In India : भारतीय ऑटो मार्केटचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा काळात आता आणखी ऑटो कंपन्यांच्या नवनवीन कार आगामी काळात लॉन्च होणार आहेत. त्यामुळे कार खरेदीदारांना नवीन कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

भारतीय ऑटो मार्केटमध्ये मारुती सुझुकीपासून ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट पर्यंतच्या कार लॉन्च होणार आहेत. या कार चाचणी ड्रमायन अनेकदा रस्त्यावर दिसून आल्या आहेत. २०२४ मध्ये या कार ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत.

1. मारुती सुझुकी eVX

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीच्या अनेक स्वस्त कार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र मारुतीने अद्याप एकही इलेक्ट्रिक कार भारतात सादर केली नाही. मारुती eVX ही त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार असू शकते. ही कार २०२५ मध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. सिंगल चार्जमध्ये 550 किमी रेंज देण्यास देखील कार सक्षम असू शकते.

2. महिंद्रा थार 5 डोअर

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची ऑफ रोडींग एसयूव्ही कार थारचे ५ डोअर व्हर्जन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. या कारमध्ये कॉस्मेटिक बदल पाहायला मिळू शकतात. कारमध्ये 2.2L डिझेल आणि 2.0L पेट्रोल इंजिन दिले जाईल. हे इंजिन MT आणि AT गिअरबॉक्स पर्यायासह सादर केले जाईल.

3. टाटा Curvv

टाटा मोटर्स लवकरच त्यांची Curvv एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. ही कार सर्वात प्रथम इलेक्ट्रिक आणि नंतर पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर केली जाणार आहे. कारचे इलेक्ट्रिक मॉडेल सिंगल चार्जमध्ये 500 किमी रेंज देण्यास सक्षम असेल. या कारमध्ये 1.5L टर्बो DI पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 168 bhp आणि 280 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल किंवा स्वयंचलित गिअरबॉक्ससह सादर केली जाईल.

4. महिंद्रा स्कॉर्पिओ आधारित पिक अप

gaadiwaadi

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांचे स्कॉर्पिओ आधारित पिक अप 2025 मध्ये भारतात लॉन्च केले जाऊ शकते. २०२३ मध्ये स्कॉर्पिओ आधारित पिक अप दक्षिण आफ्रिकेतील फ्युचरस्केप इव्हेंटमध्ये सादर केले होते. स्कॉर्पिओ आधारित पिक अपची चाचणी देखील सुरु करण्यात आली आहे.

5. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सची लपकप्रिय एसयूव्ही कार क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये भारतात लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. या कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. तसेच क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 160 PS आणि 253 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.