Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 7 Seater Cars 2024 : पुढील वर्षी लॉन्च होणार या डॅशिंग ७ सीटर कार, सफारी पेट्रोलचाही समावेश…

नवीन ७ सीटर कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण भारतीय ऑटो मार्केटमध्ये २०२४ या वर्षात नवीन ७ सीटर कार लॉन्च होणार आहेत.

0

Upcoming 7 Seater Cars 2024 : पुढील २०२४ हे नवीन वर्ष भारतीय ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे. कारण या नवीन वर्षात अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या दमदार एसयूव्ही कार सादर होणार आहेत. यामध्ये SUV, MPV आणि हॅचबॅक कारचा समावेश आहे.

तुम्हीही तुमच्या मोठ्या फॅमिलीसाठी नवीन ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण नवीन वर्षात टाटा ते महिंद्राच्या डॅशिंग ७ सीटर कार लॉन्च होणार आहेत.

1. एमजी ग्लोस्टर फेसलिफ्ट

MG कार उत्पादक कंपनीने भारतीय ऑटो मार्केटमध्ये त्यांच्या अनेक आलिशान कार सादर केल्या आहेत. त्यापैकी ग्लोस्टर ही ७ सीटर कार ग्राहकांची लोकप्रिय कार आहे. या कारचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लॉन्च केले जाणार आहे. यामध्ये कॉस्मेटिक आणि डिझाईनमध्ये काही बदल केले जाणार आहेत. कारचे इंजिन कायम ठेवले जाणार आहे.

2. टाटा सफारी पेट्रोल

टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या सफारी आणि हॅरियर कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. या दोन्ही कारमध्ये फक्त डिझेल इंजिनचा पर्याय देण्यात आला आहे. आता टाटा मोटर्स सफारी कारमध्ये पेट्रोल इंजिन देणार आहे. २०२४ मध्ये सफारीचे ७ सीटर पेट्रोल व्हेरियंट लॉन्च केले जाऊ शकते. 1.5 लीटर 4-सिलेंडर टर्बो GDI पेट्रोल इंजिन कारमध्ये दिले जाऊ शकते.

3. महिंद्रा बोलेरो निओ प्लस

महिंद्रा कार उत्पादक कंपनी देखील २०२४ मध्ये त्यांची नवीन ७ सीटर MPV कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. महिंद्राकडून त्यांची बोलेरो निओ प्लस कार लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये 2.2L mHawk डिझेल इंजिन पाहायला मिळू शकते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले असेल.

4. टोयोटा फॉर्च्युनर माईल्ड हायब्रिड

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय फॉर्च्युनर कार माईल्ड हायब्रिड इंजिनसह भारतात सादर केली जाणार आहे. २०२४ मध्ये ही कार भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुढील वर्षी लॉन्च केली जाणार आहे. कारमध्ये 48 व्होल्ट तंत्रज्ञानासह 2.8 L सौम्य हायब्रिड डिझेल इंजिन दिले जाईल.

5. न्यू-जनरेशन किया कार्निवल

किआ कार उत्पादक कंपनीकडून भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार मजबूत करण्यासाठी नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. आता किआकडून कार्निवल कारचे नवीन जनरेशन मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत.