Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 7 Seater Cars : 7 सीटर कार कार खरेदीचा प्लॅन आहे? तर जरा थांबा… २०२४ मध्ये येत आहेत या उत्तम कार्स, पहा यादी

नवीन ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण अनेक नवीन ७ सीटर कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च होणार आहेत.

0

Upcoming 7 Seater Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या ७ सीटर कार सध्या उपलब्ध आहेत. मोठ्या फॅमिलीसाठी नवीन कार खरेदी करताना अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. तुम्हीही नवीन ७ सीटर कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

कारण भारतीय ऑटो मार्केटमधील ७ सीटर कार सेगमेंटमधील विस्तार वाढवण्यासाठी अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवीन ७ सीटर कार लॉन्च करणार आहे. या नवीन ७ सीटर कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात.

ह्युंदाई अल्काझार फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सची अल्काझार ७ सीटर कार सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना आता अल्काझार कारचे फेसलिफ्ट मॉडेल बाजारात दाखल होणार आहे. या कारमध्ये लेव्हल 2 ADAS फीचर्स दिले जाईल. कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन कायम ठेवले जाईल. तसेच काही अपडेटेड फीचर्ससह कॉस्मेटिक बदल कारमध्ये पाहायला मिळू शकतात.

महिंद्रा बोलेरो निओ प्लस

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची बोलेरो निओ प्लस ७ सीटर कार २०२४ मध्ये लॉन्च केली जाणार आहे. महिंद्राकडून त्यांच्या नवीन ७ सीटर एसयूव्ही कारमध्ये 2.2L चार-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिले जाईल. कारचे हे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडले जाईल.

निसान एक्स-ट्रेल

निसान कार उत्पादक कंपनीची नवीन एक्स-ट्रेल ७ सीटर एसयूव्ही कार लवकरच भारतात सादर करू शकते. सध्या ही कार युरोपमध्ये 5 आणि 7 सीटर पर्यायामध्ये विकली जात आहे. एक्स-ट्रेल ७ सीटर कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे.

5-डोअर फोर्स गुरखा

भारतीय ऑटो मार्केटमध्ये 5-डोअर फोर्स गुरखा लवकरच लॉन्च केली जाऊ शकते. या कारची चाचणी देखील सुरु करण्यात आली आहे. ही एक ऑफ रोडींग एसयूव्ही कार असणार आहे. बाजारात लॉन्च होताच ही कार थार आणि जिमनीशी स्पर्धा करेल.