Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 7-Seater Hybrid SUVs 2024 : टोयोटा फॉर्च्युनरसह देशात लॉन्च होणार या हायब्रीड 7 सीटर SUV

देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या हायब्रीड इंजिन प्रणालीसह अनेक कंपन्यांच्या शानदार कार उपलब्ध आहेत. आता २०२४ मध्ये आणखी नवीन हायब्रीड कार्स बाजारात दाखल होणार आहेत.

0

Upcoming 7-Seater Hybrid SUVs 2024 : देशात पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त सीएनजी, इलेक्ट्रिक आणि हायब्रीड इंजिन असलेल्या कार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. आता २०२४ मध्ये भारतीय ऑटो बाजारात टोयोटा फॉर्च्युनरसह अनेक हायब्रीड ७ सीटर कार लॉन्च होणार आहेत.

1. नवीन-जनरेशन टोयोटा फॉर्च्युनर

टोयोटा कार उत्पादक कंपनी त्यांची फॉर्च्युनर ७ सीटर हायब्रीड कार लवकरच लॉन्च करणार आहे. नवीन फॉर्च्युनर कार 2.8L टर्बो डिझेल इंजिन आणि 48-व्होल्ट सौम्य हायब्रीड प्रणालीसह सुसज्ज असू शकते. हे इंजिन 200 bhp पीक पॉवर आणि 420 Nm कमाल टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असू शकते.

या कारमध्ये RWD आणि AWD दोन्ही पर्याय मिळू शकतात. तसेच कारमध्ये पेट्रोल इंजिन पर्याय देखील दिला जाऊ शकतो. ही कार TNGA-F प्लॅटफॉर्मवर तयार केली जाऊ शकते.

2. नवीन टोयोटा 7-सीटर

टोयोटा कार कंपनीकडून त्यांच्या ७ सीटर हायब्रीड कारचा विस्तार वाढवण्यासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. टोयोटा त्यांच्या कोरोला क्रॉस कारवर आधारित NGA-C प्लॅटफॉर्मचा वापर करून नवीन हायब्रीड ७ सीटर एसयूव्ही कार सादर करू शकते. कारमध्ये 2.0L पेट्रोल इंजिन असू शकते.

3. नवीन मारुती 7-सीटर SUV

मारुती सुझुकी कार कंपनीकडून देखील त्यांच्या 7-सीटर SUV कारचा सेगमेंट मजबूत करण्यासाठी ग्रँड विटारा कारचे ७ सीटर मोडले २०२४ मध्ये सादर करू शकते. कारमध्ये 2.0L पेट्रोल हायब्रिड इंजिन पाहायला मिळू शकते. कारच्या डिझाईनमध्ये किरकोळ बदल पाहायला मिळू शकतात.

4. फोक्सवॅगन Tayron

फोक्सवॅगन कार निर्मात्या कंपनीकडून Tayron कार हायब्रीड इंजिन प्रणालीसह सादर केली जाणारा आहे. ही कार MQB-Evo प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. कारमध्ये 2.0L टर्बो पेट्रोल आणि 2.0L डिझेल इंजिन पर्याय दिला जाईल. दोन्ही इंजिन 48V सौम्य हायब्रिडसह सादर केली जाईल. तसेच कारमध्ये प्लग-इन हायब्रिड पेट्रोल पॉवरट्रेन पर्याय देखील मिळेल.