Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 7-Seater : मारुती लॉन्च करणार मिनी MPV कार ! फक्त इतकी असणार किंमत…

0

Upcoming 7-Seater : मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून देशातील सर्वात स्वस्त मिनी MPV लॉन्च केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. कमी बजेटमध्ये शानदार MPV कार मारुती सुझुकीकडून लवकरच लॉन्च केली जाणार आहे.

मारुती सुझुकीकडून त्यांच्या वॅगनआर फेसलिफ्ट आणि नवीन जनरेशन स्विफ्ट आणि डिझायर अशा कार सादर केल्या जाणार आहेत. मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कार eVX, प्रीमियम 7-सीटर SUV आणि एक परवडणारी मिनी MPV कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

मारुती 7-सीटर SUV

मारुती सुझुकीकडून त्यांची 7-सीटर SUV Y17 या कोडनेमने सादर करण्यात आली आहे. ही एसयूव्ही सुझुकीच्या ग्लोबल सी आर्किटेक्चरवर आधारित ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येऊ शकते. 2025 मध्ये या कारचे उत्पादन सुरु करण्यात येईल.

मारुती सुझुकीकडून त्यांची ग्रँड विटारा एसयूव्ही कारचे 7-सीटर मॉडेल लाँच केले जाणार आहे. सध्या या एसयूव्ही कारचे 5 सीटर मॉडेल बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

ग्रँड विटाराच्या नवीन मॉडेलमध्ये 1.5 लीटर K15C पेट्रोल माइल्ड हायब्रिड आणि 1.5 लीटर अॅटकिन्सन सायकल मजबूत हायब्रिड इंजिन पर्याय मिळू शकतो.

नवीन मारुती मिनी MPV

मारुती सुझुकीकडून त्यांची मिनी MPV कार ग्राहकांना परवडणाऱ्या बजेटमध्ये लाँच केली जाणार आहे. मारुतीची ही मिनी MPV कार जागतिक बाजारपेठेतील Suzuki Spacia कारवर आधारित असेल.

Spacia कारपेक्षा या कारचे डिझाईन वेगळे असू शकते. 2026 मध्ये मारुतीची मिनी MPV कार भारतात लॉन्च केली जाऊ शकते. रेनॉल्ट ट्रायबरशी ही मिनी एसयूव्ही स्पर्धा करेल.

मारुती सुझुकीकडून त्यांच्या मिनी MPV कारमध्ये झेड-सीरीज 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. या कारमध्ये सात प्रवाशी आरामात प्रवास करू शकतात. मारुतीकडून त्यांची मिनी MPV कार 6 लाख रुपयांच्या किमतीत सादर केली जाण्याची अपेक्षा आहे.