Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 7-Seater SUVs : 2024 मध्ये लॉन्च होणार Hyundai ते Nissan पर्यंतच्या शक्तिशाली ७ सीटर एसयूव्ही, पहा यादी

नवीन ७ सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण अनेक कार कंपन्यांकडून २०२४ मध्ये त्यांच्या शक्तिशाली इंजिनसह नवीन ७ सीटर कार सादर केल्या जाणार आहेत.

0

Upcoming 7-Seater SUVs : भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांच्या ७ सीटर एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या फॅमिलीसाठी अनेकजण ७ सीटर कारचा पर्याय निवडत आहेत.

भारतात आगामी काळात खालील ७ सीटर कार लॉन्च होणार

1. Hyundai Alcazar फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्य ग्राहकांना Alcazar ७ सीटर कार उपलब्ध करून दिली आहे. आता ह्युंदाई मोटर्स त्यांच्या Alcazar कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लवकरच लॉन्च करू शकते. 2024 मध्ये ही कार सादर केली जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये लेव्हल 2 ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देखील दिले जाईल. तसेच 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय कारमध्ये उपलब्ध असेल.

2. निसान एक्स-ट्रेल

निसान कार उत्पादक कंपनीकडून त्यांची एक्स-ट्रेल ७ सीटर कार देखील येत्या आगामी काळात सादर करू शकते. चाचणी दरम्यान ही कार अनेकदा स्पॉट झाली आहे. या कारमध्ये ५ आणि ७ सीटर पर्याय दिला जाईल.

3. 5-डोअर महिंद्रा थार

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची 5-डोअर थार २०२४ मध्ये सादर केली जाणार आहे. ही कार देखील चाचणी दरम्यान अनेकदा दिसून आली आहे. सध्या थार कारचे ३ डोअर मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारचा व्हीलबेस वाढवला जाणार आहे.

4. महिंद्रा बोलेरो निओ प्लस

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची बोलेरो निओ प्लस ७ सीटर कार देखील २०२४ मध्ये भारतीय ऑटो मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. ही कार 2.2L चार-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिनसह सादर केली जाईल. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले असेल.