Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 7-Seater SUVs : 7 सीटर SUV खरेदीचा प्लॅन आहे? तर जरा थांबा… लवकरच लॉन्च होणार या 6 स्टायलिश फॅमिली कार, पहा यादी

भारतीय ऑटो बाजारातील ७ सीटर कारची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांकडून त्यांच्या आणखी नवीन ७ सीटर एसयूव्ही लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात टाटापासून टोयोटापर्यंतच्या अनेक ७ सीटर एसयूव्ही सादर केल्या जाऊ शकतात.

0

Upcoming 7-Seater SUVs : भारतीय ऑटो बाजारात अनेक कार कंपन्यांच्या ७ सीटर एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. तसेच मोठ्या फॅमिलीसाठी अनेकजण नवीन कार खरेदी करताना ७ सीटर एसयूव्ही कारचा पर्याय निवडत आहेत. तुम्हीही नवीन ७ सीटर फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण आणखी स्टायलिश ७ सीटर कार बाजारात दाखल होणार आहेत.

1. टाटा सफारी फेसलिफ्ट

टाटा मोटर्सची सफारी कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. ही एक तुमच्यासाठी सर्वोत्तम ७ सीटर कारचा पर्याय आहे. या कारचे बिन्ग सुरु झाले असून २५ हजार रुपयांमध्ये तुम्ही ही कार बुकिंग करू शकता. या कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

2. महिंद्रा बोलेरो निओ प्लस

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची बोलेरो निओ ७ सीटर कारचे निओ प्लस व्हर्जन लवकरच भारतीय ऑटो बाजारात लॉन्च होणार आहे. या कारमध्ये ७ आणि ९ सीटर पर्याय दिला जाईल. या कारमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह 2.2L mHawk डिझेल इंजिन दिले जाईल.

3. टोयोटा कोरोला क्रॉस

टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या अनेक ७ सीटर कार बाजारात उपलब्ध आहेत. या आलिशान कार खरेदीसाठी अनेकदा ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. आता टोयोटाकडून त्यांची कोरोला क्रॉस 7-सीटर कार लॉन्च केली जाऊ शकते. इनोव्हा हायक्रॉस सारख्याच प्लॅटफॉर्मवर ही कार तयार केली आजू शकते.

4. मारुती सुझुकी ग्रँड विटारा

मारुती सुझुकीकडून त्यांची ५ सीटर शानदार एसयूव्ही ग्रँड विटारा भारतात नुकतेच केली आहे. या कारला ग्राहकांचा प्रतिसाद पाहता आता मारुती सुझुकीकडून ७ सीटर ग्रँड विटारा लवकरच बाजारात दाखल केली जाऊ शकते. 2025 ही कार भारतात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. 1.5L सौम्य हायब्रिड पेट्रोल आणि 1.5L मजबूत हायब्रिड पेट्रोल इंजिनसह ही कर सादर केली जाऊ शकते.

5. निसान मॅग्नाइट आणि एक्स-ट्रेल

निसान कार निर्मात्या कंपनीकडून मॅग्नाइट कारचे नवीन व्हर्जन लॉन्च करण्यात आले आहे. मॅग्नाइटची ७ सीटर एसयूव्ही कार लवकरच बाजारात पाहायला मिळू शकते. X-Trail hybrid SUV अशी ही ७ सीटर एसयूव्ही कार असू शकते. या कारची चाचणी देखील कंपनीकडून सुरु करण्यात आली आहे.

6. 5-डोअर फोर्स गुरखा

फोर्सकडून त्यांची गुरखा ऑफ रोडींग एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली आहे. मात्र आता फोर्सकडून गुरखा कारचे 5-डोअर व्हर्जन लवकरच सादर केले जाऊ शकते. या कारमध्ये कंपनीकडून 2.6L डिझेल इंजिन वापरले जाऊ शकते. कंपनीकडून या कारची चाचणी सुरु केली आहे.