Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming 7-Seater SUVs : नवीन फॉर्च्युनरसह लॉन्च होणार या प्रीमियम 7-सीटर कार, मिळणार शक्तिशाली इंजिन

0

Upcoming 7-Seater SUVs : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या 7-सीटर कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आता अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन 7-सीटर कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

मोठ्या फॅमिलीसाठी कार खरेदी करत असताना अनेकजण 7-सीटर कारचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे 7-सीटर कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. आता अनेक कार उत्पादक कंपन्या लवकरच त्यांच्या 7-सीटर कार लॉन्च करणार आहेत.

1. MG ग्लोस्टर फेसलिफ्ट

MG कार उत्पादक कंपनीची ग्लोस्टर ही एक लक्झरी कार एसयूव्ही कार आहे. या कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. आता कंपनीकडून ग्लोस्टर फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे.

ही कार टोयोटा फॉर्च्युनरशी स्पर्धा करेल. कारमध्ये अनेक अपडेट्स पाहायला मिळतील. MG ग्लोस्टर फेसलिफ्ट चाचणी दरम्यान दिसून आली आहे.

2. नवीन स्कोडा कोडियाक

स्कोडा कार उत्पादक कंपन्यांच्या अनेक प्रीमियम कार सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आता स्कोडाकडून त्यांची नवीन स्कोडा कोडियाक 7-सीटर कार लॉन्च केली जाणार आहे. ही कार MQB इव्हो प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल.

कारमध्ये पहिल्यापेक्षा जबरदस्त फीचर्स देण्यात येतील. कारमध्ये कंपनीकडून 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन कायम ठेवले जाऊ शकते. हे इंजिन 190 PS आणि 320 Nm जनरेट करण्यास सक्षम असेल.

3. टोयोटा फॉर्च्युनर माइल्ड हायब्रिड

टोयोटा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय फॉर्च्युनर कार आता नवीन इंजिन पर्यायासह भारतात पुन्हा एकदा लॉन्च केली जाणार आहे. टोयोटा त्यांची फॉर्च्युनर MPV कार 2.8L सौम्य हायब्रिड डिझेल इंजिनसह सादर केली जाणार आहे. फॉर्च्युनर माइल्ड हायब्रिड इंजिन आणि अनेक बदलांसह सादर केली जाऊ शकते.

4. Kia EV9

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांचा 7-सीटर कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांची EV9 MPV कार लवकरच भारतात लॉन्च केली जाणार आहे. EV9 इलेक्ट्रिक SUV कार 2024 च्या शेवटी किंवा 2025 च्या सुरुवातीस लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.