Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Bikes In India : लवकरच लॉन्च होणार या 5 शक्तिशाली बाईक्स, हिमालयन इलेक्ट्रिकचाही समावेश

भारतीय दुचाकी मार्केटमध्ये आणखी नवीन बाईक्स लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे आगामी काळात बाईक प्रेमींना आणखी नवीन बाईक्सचा पर्याय मिळणार आहे.

0

Upcoming Bikes In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या बाईक्स उपलब्ध आहेत. तसेच आणखी नवीन बाईक्स देखील सादर करण्यात येत आहे. मात्र दुचाकी प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण येत्या काळात आणखी ५ नवीन बाईक्स लॉन्च होणार आहेत.

रॉयल एनफिल्ड हिमालयन इलेक्ट्रिक

रॉयल एनफिल्डने भारतीय दुचाकी मार्केटमध्ये त्यांच्या अनेक शक्तिशाली बाईक्स लॉन्च केल्या आहेत. या बाईक्सला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच रॉयल एनफिल्ड हिमालयन ४५० बाईक सादर केली आहे. आता लवकरच कंपनीकडून हिमालयन इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली जाणार आहे. कंपनीकडून बाईकच्या लॉन्चबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.

हिरो झूम 160

हिरो दुचाकी उत्पादक कंपनीकडून आता त्यांची आणखी एक शक्तिशाली इंजिन असलेली बाईक लॉन्च केली जाणार आहे. झूम 160 बाईक कंपनीकडून येत्या काळात लॉन्च केली जाणार आहे. बाईकमध्ये 160cc लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाणार आहे जे 14 bhp पॉवर आणि 13.7 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. पुढील वर्षी ही बाईक सादर केली जाणार आहे.

अल्ट्राव्हायोलेट F99

अल्ट्राव्हायोलेट F99 बाईक देखील लवकरच भारतात सादर केली जाईल. बाईकमध्ये लिक्विड-कूल्ड इंजिन दिले जाणार आहे. ही बाईक 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते या बाईकचे टॉप स्पीड 265 किमी प्रति तास असणार आहे. 2025 मध्ये कंपनीकडून बाईक लॉन्च केली जाण्याची अपेक्षा आहे.

कावासाकी निन्जा Z500

कावासाकी दुचाकी निर्मात्या कंपनीकडून त्यांची निन्जा Z500 बाईक पुढील वर्षी भारतात लॉन्च केली जाईल. बाईक 451cc समांतर ट्विन इंजिनसह सुसज्ज असेल. निन्जा 400 बाईकची निन्जा Z500 बाईक जागा घेईल. बाईकमध्ये जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत.

होंडा CB650R आणि CBR650R

होंडा कार उत्पादक कंपनीची CB650R आणि CBR650R या बाईक लॉन्च केल्या जाणार आहे. या बाईक सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र या बाईकचे अपडेटेड मॉडेल भारतात लॉन्च केले जाणार आहे.