Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Bikes : बजेट तयार ठेवा! लवकरच लॉन्च होणार रॉयल एनफिल्डच्या शक्तीशाली ५ बाईक

रॉयल एनफिल्डची नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. कारण आता कंपनीकडून लवकरच ५ नवीन बाईक्स लॉन्च केल्या जाणार आहेत.

0

Upcoming Bikes : तुम्हीही रॉयल एनफिल्डची नवीन बाईक खरेदी करत असाल तर जरा थांबा. कारण आता लवकरच रॉयल एनफिल्ड कंपनीकडून त्यांच्या अनेक बाईक लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे रॉयल एनफिल्ड बाईक प्रेमींना आणखी नवीन बाईक खरेदीचा पर्याय मिळत आहे.

एका वृत्तानुसार रॉयल एनफिल्ड येत्या २-३ महिन्यांत आपल्या पाच बाईक लॉन्च करणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता रॉयल एनफिल्डच्या आणखी नवीन ३५० सीसी असलेल्या बाईक खरेदीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

रॉयल एनफिल्डच्या बाईकची भारतामध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. तसेच तरुणांचा देखील रॉयल एनफिल्डच्या अनेक बाईकला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांची बुलेट बाईक भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे.

रॉयल एनफिल्डकडून लवकरच त्यांची 450 सीसी बाईक हिमालयन पुढील तीन महिन्यामध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच सध्या भारतात हिमालयन 411 आणि स्क्रॅम 411 या बाईकची विक्री सुरु आहे.

गेल्या आठवड्यात रॉयल एनफिल्डची मूळ कंपनी आयशर मोटर्सचा शेअर हिस्सा 11,300 कोटी रुपयांनी कमी झाला. कारण हिरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटो कंपनीच्या भागीदारीतून भारतात नवीन बाईक लॉन्च झाल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून ऑटो क्षेत्रातील कंपन्यांकडून वेगवेगळ्या बाईक लॉन्च केल्या जात आहेत. त्यामुळे एनफिल्डच्या 90 टक्के मार्केट शेअरला धोका निर्माण झाला आहे. Hero आणि Harley Davidson ने 3 जुलै रोजी Harley Davidson X440 बाईक भारतात लॉन्च केली आहे.

Harley Davidson X440 बाईकमध्ये 440cc इंजिन देण्यात आले आहे. या बाईक ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 2.29 लाख रुपये आहे. मात्र या बाईकच्या तुलनेत रॉयल एनफील्डची क्लासिक ३५० सीसी आणि मेटियर ३५० सीसी बाईक कमी किमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही कमी प्रीमियममध्ये रॉयल एनफील्डच्या बाईक खरेदी करू शकता.

तसेच भारतीय बाजारपेठेत जुलै महिन्यामध्ये ट्रायम्फने बजाज कंपनीच्या भागीदारीतून ५ जुलै रोजी स्पीड 400 आणि स्क्रॅम्बलर 400X या दोन बाईक लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही बाईकच्या भारतामध्ये एक्स शोरूम किंमत 2.33 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये ग्राहकांना आणखी नवीन कारचा पर्याय मिळाला आहे.