Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Bikes : रॉयल एनफिल्डच्या हिमालयन 350 बाईकसह लॉन्च होणार ही दमदार बाईक, पहा किंमत

सणासुदीच्या काळात अनेकजण नवीन बाईक्स घेण्याचा विचार करत असतात. त्यामुळे आता रॉयल एनफिल्डसह आणखी एका कंपनीकडून त्यांच्या नवीन बाईक्स लॉन्च केल्या जाणार आहेत.

0

Upcoming Bikes : जर तुम्हीही दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन बाईक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण आता भारतीय ऑटो मार्केटमध्ये आणखी दोन शक्तिशाली बाईक्स दाखल होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन बाईक्सचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

नवीन बाईक्स खरेदी करण्याचा प्लॅन करणाऱ्यांसाठी आता आणखी दोन शक्तिशाली बाईक्सचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच रायडींग करण्यासाठी या बाईक्स सर्वोत्तम मानल्या जात आहेत.

भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या शक्तिशाली बाईक्स उपलब्ध आहेत. मात्र आता रॉयल एनफिल्ड आणि ट्रायम्फकडून त्यांच्या नवीन बाईक्स ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. लवकरच या बाईक्स तुम्हाला ऑटो बाजारात पाहायला मिळू शकतात.

रॉयल एनफिल्ड हिमालयन 450

रॉयल एनफिल्ड हिमालयन 350 खरेदी करण्याचा विचार असेल तर जरा थांबा. कारण रॉयल एनफिल्डकडून आता हिमालयन 450 बाईक लॉन्च केली जाणार आहे. नवीन जनरेशन बुलेट 350 बाईक लॉन्च केल्यानंतर आता कंपनीकडून ही बाईक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या अखेरीस लॉन्च केली जाऊ शकते.

नवीन हिमालयन 450 बाईक 450 cc लिक्विड-कूल्ड इंजिनसह सुसज्ज असणार आहे. ही बाईक नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. बाईकमध्ये ऑल-एलईडी लाइटिंग, USD फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक रिअर सस्पेंशन, ट्रिपल नेव्हिगेशनसह ऑल-डिजिटल क्लस्टर, ट्यूबलेस टायर्ससह वायर-स्पोक व्हील देण्यात येणार आहे.

ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X

ट्रायम्फ दुचाकी उत्पादक कंपनीकडून त्यांची स्क्रॅम्बलर 400X ही शक्तिशाली बाईक देखील ऑक्टोबरमध्ये लॉन्च केली जाणार आहे. कंपनीकडून या बाईकमध्ये 398 cc सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन वापरण्यात येणार आहे. हे इंजिन 400 PS आणि 37.5 Nm टॉर्क जनरेट करेल.

स्क्रॅम्बलर 400X बाईकमध्ये अधिक ग्राउंड क्लीयरन्स, लांब व्हीलबेस आणि लांब सीट असेल. या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 2.55 लाख रुतोये असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात अनेक कंपन्यांकडून त्यांच्या दुचाकी लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.