Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars 2024 : मारुती सुझुकी 2024 मध्ये इलेक्ट्रिक कारसह लॉन्च करणार या स्टायलिश कार, पहा यादी

0

Upcoming Cars 2024 : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीकडून अनेक कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत. ग्राहकांचा देखील कारला मारुतीच्या कारला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मारुती सुझुकीने 2024 या नवीन वर्षात नवीन कार लॉन्च करण्यासाठी कंबर कसली आहे. मारुती सुझुकीने पुढील वर्षी नवीन कार लॉन्च करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. 2024 मध्ये मारुती सुझुकी त्यांच्या नवीन कार सादर करणार आहे.

मारुती सुझुकी नवीन जनरेशन स्विफ्ट

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनी त्यांचा भारतातील विस्तार वाढवण्यासाठी स्विफ्ट कारचे नवीन जनरेशन मॉडेल सादर करणार आहे. 2024 मध्ये नवीन जनरेशन स्विफ्ट कार लॉन्च केली जाणार आहे.

कारच्या बाहेरील भागात नवीन एलईडी टेल लॅम्प आणि हेडलॅम्प्स दिले जातील. नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील स्विफ्ट कारमध्ये पाहायला मिळेल. नवीन स्विफ्ट कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन दिले जाईल तसेच दुसरे 12V सौम्य हायब्रिड इंजिन देखील पाहायला मिळेल.

मारुती सुझुकी eVX

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार eVX देखील भारतीय ऑटो मार्केटमध्ये 2024 मध्ये लॉन्च केली जाणार आहे. इलेक्ट्रिक कारची लांबी 4,300 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची 1,600 मिमी असणार आहे. कारमध्ये 60 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला जाईल जो 550 किमी ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम असेल.

मारुती सुझुकी डिझायर फेसलिफ्ट

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय डिझायर कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. कंपनीकडून कारच्या लॉन्च तारखेबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

मात्र कारमध्ये डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. कारमध्ये 1.2-लिटर सौम्य-हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. ही कार चाचणी दरम्यान अनेकदा स्पॉट झाली आहे.