Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars 2024 : टाटा, महिंद्रा आणि किआ 2024 मध्ये लॉन्च करणार या कार, पहा यादी

0

Upcoming Cars 2024 : देशातील ऑटो मार्केटसाठी पुढील आगामी 2024 हे नवीन वर्ष खास ठरणार आहे. कारण येत्या 2024 या नवीन वर्षात अनेक कंपन्यांच्या शानदार एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत. किआ, टाटा आणि महिंद्रासह इतर कंपन्या त्यांच्या नवीन कार लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

MG Gloster Facelift

MG कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Gloster 7 सीटर एसयूव्ही कारचे Facelift मॉडेल 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. कंपनीकडून कारमध्ये अनके कॉस्मेटिक अपडेट्स केले जाणार आहेत. कारमध्ये आणखी एक इंजिन पर्याय दिला जाऊ शकतो.

Mahindra Thar 5 Door

महिंद्रा कार कंपनीची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही कार थारचे 5 डोअर व्हर्जन भारतात 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. ही कार अनेकदा चाचणी दरम्यान भारतीय रस्त्यावर दिसून आली आहे.

कारच्या डिझाईनमध्ये जास्त बदल करण्यात आला नाही. कारचा व्हीलबेस मोठा दिला जाऊ शकतो. नवीन थारमध्ये 2.2 लिटर डिझेल इंजिन आणि 2.0 लिटर पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे.

Tata Safari Petrol

टाटा मोटर्सने अलीकडे सफारी फेसलिफ्ट डिझेल व्हेरियंट सादर केले आहे. आता कंपनीकडून सफारी फेसलिफ्ट पेट्रोल व्हेरियंट 2024 मध्ये सादर केले जाणार आहे. कारमध्ये 1.5 लिटर 4-सिलेंडर टर्बो GDI पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे.

महिंद्रा बोलेरो निओ प्लस

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांची बोलेरो निओ प्लस 7 सीटर कार 2024 मध्ये सादर केले जाणार आहे. बोलेरो निओ प्लस ही महिंद्राची TUV300 Plus ची फेसलिफ्टेड आवृत्ती असणार आहे. कारमध्ये 2.2 लीटर mHawk डिझेल दिले जाईल.

किया कार्निवल 2024

किआ कार कंपनी त्यांच्या कार्निवल 7 सीटर कारचे नवीन मॉडेल 2024 लाँच करणार आहे. कारमध्ये अनेक बदल केले आहेत. ही कार जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे. कारमध्ये लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत.