Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars and Bike : बजेट तयार ठेवा! पुढील आठवड्यात लॉन्च होणार स्टायलिश कार आणि शक्तिशाली बाईक, पहा सविस्तर

नवीन कार किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण आता आणखी नवीन बाईक आणि कार ऑटो बाजारात लॉन्च होणार आहेत.

0

Upcoming Cars and Bike : भारतीय ऑटो क्षेत्रासाठी येणार काळ आणखी खास ठरणार आहे. कारण आता भारतात सणासुदीचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे या काळात अनेक कंपन्यांकडून त्यांच्या नवीन कार आणि बाईक्स लॉन्च केल्या जातात.

भारतीय ऑटो बाजारात पुढील आठवड्यात आणखी नवीन कार आणि शक्तिशाली बाईक लॉन्च होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन कार आणि बाईकचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तुम्ही दखल नवीन बाईक आणि कार खरेदीसाठी थोडी वाट पाहू शकता.

मर्सिडीज EQE

जर्मन ऑटोमोबाईल निर्माता कंपनी मर्सिडीज त्यांची आणखी एक नवीन आलिशान कार भारतीय ऑटो क्षेत्रात सादर करणार आहे. EQE इलेक्ट्रिक SUV लॉन्च होणार आहे. ही EQB SUV आणि EQS इलेक्ट्रिक सेडान नंतर मर्सिडीजची तिसरी इलेक्ट्रिक कार असणार आहे.

ही EV कार EQE 293 hp पॉवर आणि 565 Nm टॉर्क जनरेट करते. कारमध्ये सिंगल-मोटर सेटअप देण्यात आला आहे. कारमध्ये 90.6 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल.

टाटा नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट 14 सप्टेंबर रोजी भारतीय ऑटो क्षेत्रात लॉन्च केली जाणार आहे. इलेक्ट्रिक कारची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने टाटाकडून नेक्सॉन ईव्हीमध्ये बदल करत नवीन अपडेट्ससह नेक्सॉन लॉन्च केली जाणार आहे. या कारचे बुकिंग सुरु झाले असून तुम्ही २१ हजार रुपये भरून ही कार बुकिंग करू शकता. कारमध्ये 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे.

Kawasaki Ninja ZX-4R

Kawasaki दुचाकी कंपनीकडून त्यांची आणखी एक शक्तिशाली स्पोर्ट बाईक भारतीय ऑटो क्षेत्रात लॉन्च केली जाणार आहे. Ninja ZX-4R असे या बाईकचे नाव असणार आहे. बाईकमध्ये 399 सीसीचे चार-सिलेंडर इंजिन देण्यात येणार आहे.

हे इंजिन 6 स्पीड ट्रान्समिशन युनिटशी जोडलेले असेल. बाईकचे इंजिन 78 bhp ची पॉवर आणि 37.6 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. बाइकमध्ये स्पोर्ट, रोड, रेन आणि रायडर असे चार राइडिंग मोड देण्यात आले आहेत.