Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars In India : या महिन्यात लॉन्च होणार लक्झरी फीचर्स आलिशान कार्स, टाटा पंच EV आणि लेक्सस LM चा समावेश

भारतीय ऑटो मार्केटसाठी येणार काळ खास ठरणार आहे. कारण या महिन्यात अनेक कंपन्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च होणार आहे.

0

Upcoming Cars In India : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण या महिन्यात आणखी जबरदस्त नवीन कार लॉन्च होणार आहेत. या आगामी कारमध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोल कारचा समावेश आहे.

तुम्हालाही दिवाळीमध्ये शानदार मायलेज देणारी आणि स्टायलिश कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी आणखी नवीन कार सादर केल्या जाणार आहेत. या कारमध्ये अनके दमदार फीचर्स दिले जाणार आहेत.

निसान Magnite

निसान Magnite एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल लवकरच ऑटो बाजारात सादर केले जाणार आहे. Magnite Kuro असे हे नवीन एडिशन असणार आहे. सध्या ही एसयूव्ही सीव्हीटी ट्रान्समिशनसह बाजारात विकली जात आहे. नवीन कारमध्ये इंटीरियर आणि काही फीचर्स नवीन दिले जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये ही कार लॉन्च केली जाऊ शकते. या कारचे बुकिंग सुरु झाले आहे.

टाटा पंच इलेक्ट्रिक

टाटा पंच ही एसयूव्ही कार देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. कंपनीकडून पंच ईव्ही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. टाटा मोटर्सने सप्टेंबर महिन्यात Nexon EV फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. आता पंच ईव्ही देखील अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे.

लेक्सस LM

लेक्सस कार उत्पादक कंपनीकडून त्यांची आलिशान लक्झरी कार LM MPV या महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. ही एमपीव्ही टोयोटा वेलफायर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनीकडून या कारसाठी ऑगस्ट महिन्यापासूनच बुकिंग सुरु करण्यात आले आहे.

फोर्स गुरखा 

फोर्स कार कंपनीकडून त्यांची गुरखा ऑफ रोडींग एसयूव्ही कारचे अपडेटेड मॉडेल लवकरच लॉन्च केले जाणार आहे. ही कार टेस्टिंग दरम्यान अनेकदा दिसून आली आहे. ही कार ७ सीटर पर्यायांमध्ये सादर केली जाऊ शकते.

BYD सील

भारतीय ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये वाढ होऊ लागल्याने अनेक कंपन्या त्यांच्या ईव्ही कार सादर करत आहेत. BYD सील ही इलेक्ट्रिक कार लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. थायलंडमध्ये 30 ते 37 लाख रुपये किमतीत BYD सील इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे. भारतात या कारची किंमत 60 लाख रुपये असू शकते.