Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars In India : नवीन वर्षात या 3 SUV गाजवणार भारतीय मार्केट ! क्रेटा ते XUV300 चा समावेश

0

Upcoming Cars In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये 2024 या नवीन वर्षात अनेक नवीन एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे 2024 हे नवीन वर्ष ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे. तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा.

आगामी काळात ह्युंदाई मोटर्ससह किआ कार उत्पादक कंपनी त्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. यामध्ये क्रेटा, XUV300 आणि Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारचा समावेश आहे.

1. किआ सोनेट फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या सोनेट एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. Sonet एसयूव्ही कार भारतात सर्वात प्रथम 2020 लॉन्च करण्यात आली होती. या कारच्या बेस मॉडेलची सध्याची एक्स शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आहे.

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारचा नुकताच कंपनीकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि नवीन ड्रॉप-डाउन एलईडी डीआरएलसह नवीन डिझाइन ग्रिल पाहायला मिळत आहे. नवीन एअर डॅम आणि नवीन डिझाईनचा बंपरही कारमध्ये दिसत आहे.

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेक वितरण, आपत्कालीन स्टॉप सिग्नल, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM) आणि अँटिलॉक ब्रेक सिस्टम (ABS) सारखी वैशिष्ट्ये दिली जातील.

2. Hyundai Creta Facelift

ह्युंदाई मोटर्स 2024 या नवीन वर्षात त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे. या कारच्या डेझझाईन आणि फीचर्समध्ये मोठे पाहायला मिळतील.

क्रेटा फसकीफ्ट एसयूव्ही कारमध्ये ड्युअल टोन अपहोल्स्ट्री, समायोज्य हेडरेस्टसह सीट्स, एसी सीट्स, साइड एसी व्हेंट्स, कनेक्टेड स्क्रीनसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि ड्राइव्ह मोड्स दिले जातील. तर कारमध्ये सुरक्षेसाठी 6 एअरबॅग, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, EBD आणि ESP अशी वैशिष्ट्ये दिली जातील.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये लेव्हल दोनचे ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये दिले जाऊ शकते. यामध्ये ब्लाइंड स्पॉट कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट कोलिजन अवॉयडन्स असिस्ट, अवॉयडन्स असिस्टसह फॉरवर्ड कोलिजन अलर्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, लेन फॉलो असिस्ट, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फ्रंट व्हेइकल डिपार्चर वॉर्निंग, ड्रायव्हर अटेंशन अॅलर्ट, हाय अलर्ट अशा फीचर्सचा समावेश असेल.

3. महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

महिंद्रा कार उत्पादक कंपनी येत्या काळात त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. XUV300 एसयूव्ही कार चाचणी दरम्यान अनेकदा दिसून आली आहे. कारमध्ये अनेक बदल केले जाणार असून डिझाईनमध्ये देखील मोठा बदल दिसेल.

XUV300 एसयूव्ही कारमध्ये ADAS हे सुरक्षा वैशिष्ट्ये जोडले जाऊ शकते. तसेच नवीन हेडलाइट्स, समोरील बाजूस C-आकाराचे LED DRLs, कनेक्ट केलेल्या LED स्ट्रिपसह नवीन टेल लाइट्स, आकर्षक अलॉय व्हील्स, एक मोठी टचस्क्रीन आणि काही फीचर्स कारमध्ये जोडले जाऊ शकतात. XUV300 फेसलिफ्टमध्ये पॅनोरामिक सनरूफ दिले जाऊ शकते.