Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars In India : क्रेटा फेसलिफ्टसह देशात लॉन्च होणार या 5 कार, मिळणार शक्तिशाली इंजिनसह लक्झरी फीचर्स

0

Upcoming Cars In India : देशात दिवसेंदिवस कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक कार कंपन्या त्यांच्या नवनवीन कार लॉन्च करत आहेत. एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु असल्याने एसयूव्ही सेगमेंटमधील कार लॉन्च करण्यावर अनेक कंपन्या जास्त भर देत आहेत.

तुम्हीही या नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण या वर्षात अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन कार लॉन्च करणार आहेत. या कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह प्रीमियम फीचर्स देखील दिली जाणार आहेत.

खालील 5 कार लॉन्च होणार

मारुती सुझुकी नवीन जनरेशन स्विफ्ट

मारुती सुझुकीची लोकप्रिय हॅचबॅक कार स्विफ्ट आता नवीन अवतारात लॉन्च होणार आहे. स्विफ्ट कारचे नवीन जनरेशन मॉडेल भारतात लवकरच लॉन्च केले जाणार असून कारच्या डिझाईनमध्ये मोठे बदल केले करण्यात आले आहेत.

कारमध्ये एक सौम्य हायब्रीड इंजिन पर्याय देण्यात येणार आहे. त्यामुळे कारचे मायलेज देखील वाढणार आहे. नवीन जनरेशन स्विफ्ट कारची अनेकदा चाचणी देखील घेण्यात आली आहे. चाचणी दरम्यान ही कार स्पॉट देखील झाली आहे. स्विफ्ट कारमध्ये नवीनतम फीचर्स आणि आकर्षक लूक देण्यात आला आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच लॉन्च केले जाणार आहेत. 16 जानेवारीला ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार अधिकृतरित्या भारतात लॉन्च केली जाणार आहे.

क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये लेव्हल 2 ADAS फीचर्स जोडले जाणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये 360 डिग्री सारखी नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित अनेक फीचर्स दिले जाणार आहेत.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

महिंद्रा कार उत्पादक कंपनी त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल यावर्षीच भारतात लॉन्च करणार आहे. या कारमध्ये देखील अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.

XUV300 फेसलिफ्ट एसयूव्ही कार चाचणी दरम्यान दिसून आली आहे. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. XUV300 फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक अपडेट्स तुम्हाला दिसून येतील.

Kia Sonet फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कार मागील महिन्यातच भारतात सादर करण्यात आली आहे. Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारचे बुकिंग देखील सुरु करण्यात आले आहे.

आता या जानेवारी महिन्यात कारची ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाणार आहे. कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कंपनीकडून लवकरच कारच्या किमती देखील जाहीर केल्या जातील.

महिंद्रा XUV400 फेसलिफ्ट

महिंद्रा कार उत्पादक कंपनीने त्यांची एकमेव इलेक्ट्रिक कार XUV400 भारतात सादर केली आहे. सध्या इलेक्ट्रिक कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता महिंद्राने त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिंद्रा लवकरच त्यांच्या XUV400 इलेक्ट्रिक कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. कारमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट आणि क्लायमेट कंट्रोलसारखे अनेक बदल दिसून येतील.