Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars In India : न्यू जनरेशन स्विफ्टसह देशात लॉन्च होणार या मस्त कार, पहिल्यापेक्षा असणार इतक्या शक्तिशाली

देशात अनेक कंपन्यांच्या नवीन कार पुढील वर्षी लॉन्च होणार आहेत. यासाठी अनेक कार उत्पादक कंपन्या सज्ज आहेत. कारमध्ये अनेक नवीन बदलांसह आधुनिक फीचर्स जोडले जाणार आहेत.

0

Upcoming Cars In India : भारतीय ऑटो मार्केटमध्ये पुढील वर्षी २०२४ मध्ये आणखी नवीन कार लॉन्च होणार आहेत. कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवनवीन कार सादर करणार आहेत. यामध्ये ह्युंदाई, टाटा आणि मारुतीच्या कारचा समावेश आहे.

तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नवीन कार सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. यामधील काही कार सध्या ऑटो मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या कारचे नवीन जनरेशन मॉडेल मोठ्या बदलांसह बाजारात येणार आहेत.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. २०२४ च्या सुरुवातीला ही कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. कारमध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळतील.

क्रेटा फेसलिफ्ट कारमध्ये कॉस्मेटिक बदलांसह नवीन डिझाईन देखील दिले जाईल. नवीन क्रेटा कार चाचणी दरम्यान स्पॉट झाली आहे. नवीन फ्रंट एंड, नवीन हेडलॅम्प आणि बंपर दिला जाईल. तसेच कारमध्ये लेव्हल २ चे ADAS सुरक्षा फीचर्स दिले जाईल.

नवीन-जनरेशन मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकीची लोकप्रिय सेडान कार स्विफ्ट कारचे न्यू जनरेशन २०२४ मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. नवीन स्विफ्ट कारमध्ये 1.2L Z-सिरीज तीन-सिलेंडर सौम्य-हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. कारच्या डिझाईन मध्ये देखील बदल केल्याचे समोर आले आहे.

Kia Sonet फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनी देखील त्यांच्या नवीन कार भारतीय ऑटो बाजारात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. २०२४ मध्ये किआ त्यांच्या Sonet कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करणार आहे. कारमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. तसेच नवीन मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम कारमध्ये दिली जाईल.

टाटा कर्व ईव्ही

टाटा मोटर्सकडून २०२४ मध्ये त्यांची नवीन संकल्पनेवर आधारित Curvv EV कार लॉन्च केली जाणार आहे. २०२४ च्या पहिल्या ६ महिन्यात त्यांची ही कार लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.

सिंगल चार्जमध्ये 550 किमी रेंज देण्यास सक्षम असलेला बॅटरी पॅक कारमध्ये दिला जाऊ शकतो. तसेच ही कार इलेक्ट्रिक नंतर 1.5L टर्बो पेट्रोल इंजिनसह बाजारात सादर केली जाऊ शकते.