Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

कार बाजार पुन्हा तापणार! भन्नाट फीचर्ससह लाँच होणार ‘ह्या’ जबरदस्त कार्स; जाणून घ्या सविस्तर। Upcoming Cars In India

आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात येत्या 2-3 महिन्यांत एकापेक्षा एक मस्त मस्त कार लाँच होणार आहे. ज्यांना तुम्ही खरेदीचा विचार करू शकतात.

0

Upcoming Cars In India : जर येत्या 2-3 महिन्यांत तुम्ही नवीन कार खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात येत्या 2-3 महिन्यांत एकापेक्षा एक मस्त मस्त कार लाँच होणार आहे. ज्यांना तुम्ही खरेदीचा विचार करू शकतात.

हे जाणून घ्या लाँच होणाऱ्या या कार्समध्ये तुम्हाला उत्तम फीचर्ससह बेस्ट मायलेज तसेच दमदार इंजिन पाहायला मिळणार आहे. यामुळे सध्या तुम्ही नवीन कार खरेदीसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करू शकतात. चला मग जाणून घेऊया भारतीय बाजारात कोणत्या कोणत्या कार्स येत्या काही दिवसात लाँच होणार आहे.

Tata Nexon Facelift

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी अनेक तांत्रिक आणि डिझाइन बदलांसह बाजारात टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट सादर करणार आहे. समोरच्या फॅसिआला सध्याच्या मॉडेलपेक्षा नवीन बोनेट, हेडलॅम्प क्लस्टर आणि बंपर स्पोर्टियर मिळू शकेल, तर साइड प्रोफाईल पुन्हा डिझाइन केलेले अलॉय व्हील आणि काही अपडेट्स वगळता मुख्यत्वे सारखेच राहण्याची शक्यता आहे.

त्याच वेळी, त्याचा रियर पूर्णपणे वेगळा असण्याची शक्यता आहे. टाटा नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये नवीन एलईडी टेल लॅम्प आणि अपडेटेड बूट स्पेस दिले जाऊ शकते. कारची बॉडी देखील Curvv कॉन्सेप्टने प्रेरित असू शकते. कंपनी ऑगस्टपर्यंत लॉन्च करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Honda Elevate

कंपनीची ही मिड साइज एसयूव्ही वेगाने वाढणाऱ्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये येत्या काही दिवसात प्रवेश करणार आहे. Honda Elevate ची भारतीय कार बाजारपेठेत थेट Hyundai Creta शी स्पर्धा होणार आहे. कंपनीने भारतीय बाजारपेठेत SUV म्हणून BR-V देखील आणली, परंतु सर्व फीचर्स असूनही, BR-V ही अगदी सोपी ऑफर होती. कंपनी सप्टेंबरपर्यंत त्याच्या किमती जाहीर करू शकते.

Kia Seltos Facelift

Kia Seltos Facelift जुलैच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली. सेल्टोसला नवीन अपग्रेड प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अपडेटेड फेसलिफ्ट पूर्वीपेक्षा जास्त फीचर लोड केलेले आहे. अगदी addas सेफ्टी फीचर्स देखील यात जोडण्यात आले आहेत. सेल्टोस हे किआचे सर्वाधिक विकले जाणारे उत्पादन आहे.

Tata Harrier/ Safari Facelift

नवीन अपडेटेड हॅरियर आणि सफारीला लूक आणि डिझाइनच्या बाबतीत ताजे डिझाइन मिळू शकते. या कारचे इंजिनही कंपनी अपग्रेड करेल अशी शक्यता आहे. त्याचबरोबर इतर अत्याधुनिक फीचर्सची भर घालण्याच्या चर्चाही समोर येत आहेत.

टाटा सफारी आणि हॅरियरचे स्वतःचे वेगळे मार्केट आहे, पण अपडेटेड व्हर्जन लाँच झाल्यानंतर पुन्हा एकदा एसयूव्ही मार्केटचे तापमान वाढेल यात शंका नाही. ऑक्टोबरपर्यंत ह्या कार्स बाजारात दाखल होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.