Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Cars In India : ऑक्‍टोबरमध्ये लॉन्च होणार या स्टायलिश SUV, टाटाच्या दोन EV कारचाही समावेश

नवीन कार खरेदी करत असाल तर जरा थांबा. कारण पुढील महिन्यात आणखी नवीन कार्स लॉन्च होणार आहेत. यामध्ये EV कारचा देखील समावेश आहे.

0

Upcoming Cars In India : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे या काळात अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. अशातच कारची मागणी वाढत असल्याने अनेक कंपन्यांच्या या काळात नवीन एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत.

ऑक्‍टोबर महिना वाहन क्षेत्रासाठी चांगला असणार आहे. कारण या महिन्यात नवीन EV कार्स आणि इतर कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये टाटा मोटर्सची दोन लोकप्रिय एसयूव्ही EV कारचा समावेश आहे.

टाटा पंच इ.व्ही

टाटा मोटर्सच्या पंच एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कारचे अलीकडेच सीएनजी मॉडेल सादर करण्यात आले आहे. पंच एसयूव्ही कमी किमतीत उपल्बध असल्याने कमी बजेट ग्राहकांसाठी ही कार सर्वोत्तम आहे. आता टाटा मोटर्सकडून पुढील महिन्यात पंच EV सादर केली जाऊ शकते. या कारमध्ये Nexon EV सारखे फीचर्स जोडले जाऊ शकतात. तसेच पंच इलेक्ट्रिक कारची किंमत देखील कमी असणार आहे.

टाटा मोटर्सची पंच EV कार अनेकदा चाचणीदरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. या कारमध्ये अनेक नवीन बदल पाहायला मिळत आहेत. कारमध्ये एलईडी हेडलाइट सेटअप तसेच डिजिटल लोगोसह टाटाचे नवीन टू-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळू शकते.

टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून त्यांच्या हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट या दोन कार देखील पुढील महिन्यात लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. या कार देखील अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आल्या आहेत. हॅरियर चे नवीन EV मॉडेल बाजारात सादर केले जाणार आहे.

तसेच सफारी एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल पुढील महिन्यात लॉन्च होऊ शकते. एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि एलईडी डीआरएलच्या नवीन सेटसह पुन्हा डिझाइन केलेल्या फ्रंटसह ही कार लॉन्च केली जाऊ शकते.

Nissan Magnite Kuro

जपानी कार उत्पादक कंपनीकडून ऑक्टोबरमध्ये त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल मॅग्नाइट एसयूव्हीची नवीन मॉडेल लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मॅग्नाइट कुरो असे कारचे नाव असणार आहे. या कारचे सप्टेंबरमध्ये बुकिंग सुरू करण्यात आले आहे. 11,000 रुपयांमध्ये ही कार बुक करू शकता.

मॅग्नाइट एसयूव्ही ही आयसीसी विश्वचषक स्पर्धेची अधिकृत कार असणार आहे. Magnite Kuro ही कार XV MT, Turbo XV MT आणि Turbo XV CVT या व्हेरियंटमध्ये सादर केली जाऊ शकते.