Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming EV Car : नवीन कार खरेदी करताय? जरा थांबा, बाजारात लवकर लाँच होणार आहेत जबरदस्त इलेक्ट्रिक कार

बाजारात आता लवकरच शानदार फीचर्स आणि रेंज असणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच होणार आहेत. पहा त्यांची यादी.

0

Upcoming EV Car : इंधनाच्या किमती वाढल्याने बाजारात आता इलेक्ट्रिक कार लाँच होऊ लागल्या आहेत. परंतु मागणी जास्त असल्याने त्यांच्या किमती जास्त आहेत. जर तुम्ही येत्या काही दिवसात नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर जरा थांबा.

कारण आता बाजारात जबरदस्त इलेक्ट्रिक कार लवकर लाँच होणार आहेत. यात तुम्हाला शानदार फीचर्ससोबत शानदार रेंजही मिळेल. यामध्ये टाटा पंच इव्ही पासून ते Kia EV9 यांचा समावेश आहे. पहा त्यांची यादी.

Hyundai Kona Electric

असे बोलले जात की हे मॉडेल या वर्षाच्या शेवटी तुम्ही भारतीय बाजारात पाहू शकता. तसेच या वाहनाची रेंज 450 किलोमीटर असू शकते. इतकेच नाही तर बॅटरीच्या चांगल्या श्रेणीसाठी यात E GMP स्केटबोर्ड आर्किटेक्चरचा वापर केला केला जाईल. खरं तर, Hyundai कंपनी भारतीय बाजारपेठेत, इलेक्ट्रिक मार्केटमध्ये आपली चांगली पकड करण्यासाठी वेगाने नवीन वाहने लॉन्च करत आहे.

टाटा पंच इव्ही

सर्वात अगोदर या मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर टाटा मोटर्स कंपनी आपले टाटा पंच ईव्ही मॉडेल लॉन्च करणार आहे. कंपनीची आगामी कार डिसेंबर महिन्यापर्यंत हे मॉडेल बाजारात येईल. या मॉडेलची रेंज 350 किमी इतकी असणार आहे. ही 5 सीटर कार असू शकते. कारच्या किंमतीबद्दल सांगायचे झाले तर ते 11 लाख ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान ग्राहकांना खरेदी करता येईल. दरम्यान, कंपनीने नुकतीच आपली Nexon EV मॉडेल बाजारात आणले आहे.

Kia EV9

खरंतर कंपनी येत्या सणासुदीच्या काळामध्ये EV 9 मॉडेल लॉन्च करू शकते. या कंपनीने 2023 ऑटो एक्सपोमध्ये हे मॉडेल सादर केले होते. कंपनीच्या नवीन मॉडेलमध्ये तब्बल 541 किलोमीटरची रेंज मिळण्याची शक्यता आहे. कंपनी फास्ट चार्जिंगवरही लक्ष केंद्रित करेल. यात अल्ट्रा फास्ट 800V चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये पाहायला मिळेल.

Tata Curvv EV

टाटा मोटर्स आपल्या इलेक्ट्रिक वाहन विभागाचा आणखी विस्तार करत आहे. त्यासाठी बाजारात Tata Curve EV लाँच होणार आहे. Tata च्या या इलेक्ट्रिक मॉडेलची रेंज 550 किमी पर्यंत असू शकते. तसेच या कारमध्ये दोन बॅटरी पॅक मिळू शकतात.