Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Midsize SUVs : Tata Curvv, Creta facelift सह लॉन्च होणार या ३ मिडसाईज एसयूव्ही, मिळणार शक्तिशाली इंजिनसह प्रीमियम फीचर्स

भारतीय ऑटो मार्केटमध्ये आणखी नवीन मिडसाईज एसयूव्ही लॉन्च करण्यासाठी कार उत्पादक कंपन्यांनी कंबर कसली आहे. यामध्ये Creta facelift आणि टाटा Curvv एसयूव्ही कारचा समावेश आहे.

0

Upcoming Midsize SUVs : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवीन मिडसाईज एसयूव्ही आगामी काळात लॉन्च केल्या जाणार आहेत.

भारतीय ऑटो मार्केटमधील ५ सीटर मिडसाईज एसयूव्ही सेगमेंट मजबूत करण्यासाठी ह्युंदाईपासून टाटा मोटारसारख्या अनेक कार कंपन्यांनी कंबर कसली आहे. आगामी मिडसाईज एसयूव्ही कार तुमच्या फॅमिलीसाठी उत्तम ५ सीटर एसयूव्ही कार ठरू शकतात.

Creta Facelift

ह्युंदाई कार निर्मात्या कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही Creta कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतात २०२४ मध्ये लॉन्च केले जाऊ शकते. या कारची जागतिक बाजारपेठेत चाचणी देखील सुरु आहे. २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यात ह्युंदाई मोटर्स Creta फेसलिफ्ट एसयूव्ही कार लॉन्च करू शकते.

नवीन Creta फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नवीन फ्रंट आणि रियर डिझाईन असेल. तसेच कारमध्ये लेव्हल 2 ADAS सुरक्षा फीचर्स दिले जाऊ शकते. Creta फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते. कंपनीकडून कारमध्ये 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाईल.

टाटा कर्व

टाटा मोटर्सकडून त्यांची २०२४ मध्ये Curvv एसयूव्ही कार सादर केली जाणार आहे. ही कार इलेक्ट्रिक आणि पेट्रोल दोन्ही व्हेरियंटमध्ये लॉन्च केली जाणार आहे. टाटा मोटर्सने २०२४ च्या ऑटो एक्स्पोमध्ये Curvv एसयूव्ही कार सादर केली आहे.

टाटा मोटर्स या कारमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन 170 bhp आणि 280 Nm पीक टॉर्क देणारे इंजिन देऊ शकते. तसेच Curvv इलेक्ट्रिक कार 400 किमी रेंज देण्यास सक्षम असू शकते.

नवीन-जनरेशन रेनॉल्ट डस्टर

रेनॉल्ट कार उत्पादक कंपनीची Duster एसयूव्ही कारचे उत्पादन बंद करण्यात आले असले तरी रेनॉल्ट त्यांच्या नवीन Duster एसयूव्ही कारवर काम करत आहे. Dacia नावाने त्यांची ही एसयूव्ही कार लॉन्च जाऊ शकते.

२९ नोव्हेंबर २०२३ रोजी जागतिक बाजारपेठेत ही एसयूव्ही कार पदार्पण करेल. CMF-B मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात येईल. ही नवीन एसयूव्ही कार 5 आणि 7-सीटर पर्यायामध्ये सादर केली जाईल. कारमध्ये टर्बो पेट्रोल पॉवरट्रेन दिले जाईल.