Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Off-Road SUV 2024 : पुढील वर्षात लॉन्च होणार या नवीन ऑफ-रोडिंग SUVs, थार 5 डोअरचाही समावेश

0

Upcoming Off-Road SUV 2024 : देशातील ऑटो मार्केटमध्ये अनके कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत. या एसयूव्ही कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसयूव्ही कारमध्ये ऑफ रोडींग कारचाही समावेश आहे.

तुम्हालाही नवीन ऑफ रोडींग एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण पुढील 2024 या नवीन वर्षात आणखी नवीन ऑफ रोडींग एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत.

5-डोअर महिंद्रा थार

महिंद्रा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय ऑफ रोडींग एसयूव्ही थारचे आता नवीन 5-डोअर व्हर्जन 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. या कारच्या व्हील बेसमध्ये मोठा बदल पाहायला मिळेल. नवीन थार एसयूव्हीमध्ये नवीन हेडलाइनर, फ्रंट आर्मरेस्ट, सनग्लासेस होल्डर आणि इलेक्ट्रिक सनरूफ अशा वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.

नवीन थार चाचणी करताना अनेकदा दिसून आली आहे. Thar 5-डोअर कारमध्ये 2.2-लीटर डिझेल इंजिन आणि 2.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिले जाईल. नवीन थार एसयूव्ही कारमध्ये 4×4 आणि 4×2 असे पर्याय दिले जातील.

नवीन-जनरेशन टोयोटा फॉर्च्युनर

टोयोटा कार उत्पादक कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही कार फॉर्च्युनरचे नवीन जनरेशन मॉडेल 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. GD Hybrid सौम्य-हायब्रिड टर्बो डिझेल इंजिनसह नवीन फॉर्च्युनर एसयूव्ही कार सादर केली जाईल. नवीन फॉर्च्युनर देखील ऑफ रोडींग एसयूव्ही कारपैकी एक उत्तम पर्याय आहे.

ह्युंदाई टक्सन फेसलिफ्ट

ह्युंदाई कार उत्पादक कंपनी 2024 मध्ये त्यांच्या अनेक नवीन एसयूव्ही कार सादर करणार आहे. 2024 मध्ये ह्युंदाई मोटर्स त्यांची टक्सन फेसलिफ्ट ही ऑफ रोडींग एसयूव्ही कार सादर केली जाणार आहे. टक्सन एसयूव्ही कार सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

मात्र टक्सन कारचे फेसलिफ्ट मॉडेल कंपनीकडून सादर केले जाणार आहे. कारच्या फीचर्स आणि डिझाईनमध्ये काही अपडेट्स पाहायला मिळू शकतात. कंपनीकडून कारच्या इंजिनबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.