Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Sedan Cars In India : शानदार अपडेट्ससह लवकरच लॉन्च होणार या लोकप्रिय सेडान कार, पहा यादी

नवीन सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण मारुती सुझुकीची लोकप्रिय कार आणि इतर कंपन्यांच्या सेडान कार लवकरच लॉन्च होणार आहेत.

0

Upcoming Sedan Cars In India : भारतीय बाजारपेठेत एसयूव्ही कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे सेडान कारची लोकप्रियता कमी झाली आहे. पण आजही काही सेडान कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

तुम्हालाही सेडान कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही सेडान कार नवीन अपडेट्ससह पुन्हा एकदा सादर केल्या जाणार आहेत.

New-Gen Maruti Suzuki Drize

मारुती सुझुकीकडून त्यांची लोकप्रिय सेडान कार Drize लवकरच नवीन बदलांसह बाजारात सादर केली जाणार आहे. मारुतीची Drize सेडान कार सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. 2024 च्या मध्यात ही कार सादर केली जाणार आहे. कारच्या डिझाईनमध्ये बदल पाहायला मिळू शकतात. तसेच कारमध्ये 1.2 लीटर मजबूत हायब्रिड पेट्रोल इंजिन मिळू शकते जे 35 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम शकते.

2024 New-Gen Honda Amaze

होंडा कार उत्पादक कंपनीची Amaze कारला सध्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आता कंपनीकडून Amaze कारचे नवीन मॉडेल सादर करण्याची तयारी सुरु केली आहे. PF2 प्लॅटफॉर्मच्या आधारावर Amaze कारचे नवीन मॉडेल 2024 मध्ये लॉन्च होऊ शकते. कारमध्ये ADAS हे फीचर सेफ्टी फीचर मिळू शकते.

Hyundai IONIQ 6

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची सेडान इलेक्ट्रिक कार देखील सादर करण्याची तयारी केली आहे. IONIQ 6 EV कार 2023 ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली आहे. ही कार जागतिक बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे. सिंगल चार्जवर 614 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. ही कार E-GMP स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित आहे जे Hyundai IONIQ 5 आणि Kia EV6 वर आधारित आहे.

BYD Seal

BYD Seal ही कार 2023 ऑटो एक्सपोमध्ये इलेक्ट्रिक सेडान कार म्हणून सादर करण्यात आली होती. ही कार दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येते. यात 82.5 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार फक्त 3.8 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. लवकरच भारतीय ऑटो मेर्केट्मध्ये देखील ही कार पाहायला मिळू शकते.