Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Sedans In India : 2024 मध्ये लॉन्च होणार या 4 आलिशान सेडान कार ! डिझायर ते Verna चा समावेश

0

Upcoming Sedans In India : देशातील ऑटो मार्केटमध्ये एसयूव्ही कारचा ट्रेंड सुरु असला तरी अनेक कार उत्पादक कंपन्या 2024 मध्ये त्यांच्या नवीन सेडान कार लॉन्च होणार आहेत. यामध्ये मारुती ते ह्युंदाई कारचा समावेश आहे.

1. नवीन-जनरेशन मारुती सुझुकी डिझायर

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या डिझायर कारचे नवीन जनरेशन मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. मारुतीच्या नवीन जनरेशन डिझायर सेडान कारमध्ये 1.2L Z-सिरीज सौम्य-हायब्रीड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. तसेच कारच्या डिझाईन आणि फीचर्समध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.

2. नवीन Honda Amaze

होंडा कार उत्पादक कंपनीकडून 2024 मध्ये Amaze सेडान कारचे नवीन मॉडेल सादर केले जाणार आहे. सुझुकी डिझायरला टक्कर देण्यासाठी होंडा त्यांच्या Amaze सेडान कारचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

3. Hyundai Verna N-Line

ह्युंदाई कार उत्पादक कंपनीच्या लोकप्रिय सेडान कार Verna चे N-Line मॉडेल 2024 मध्ये लॉन्च केले जाणार आहे. या कारमध्ये नवीन फीचर्स जोडले जाऊ शकतात. तसेच कारमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. कारमध्ये काही कॉस्मेटिक सुधारणा केल्या जाणार आहेत.

4. Hyundai Ioniq 6

ह्युंदाई मोटर्सकडून त्यांची Ioniq 6 इलेक्ट्रिक कार जागतिक बाजारपेठेत जुलै 2022 मध्येच सादर करण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये ही कार 614 किमी रेंज देण्यास सक्षम आहे. Ioniq 5 इलेक्ट्रिक कार सध्या बाजारात उपलब्ध आहे. आता लवकरच Ioniq 6 इलेक्ट्रिक कार भारतात देखील सादर केली जाणार आहे. GMP स्केटबोर्ड आर्किटेक्चर ही कार विकसित केली जाईल.