Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Sonet Facelift : Brezza, Nexon आणि Venue चे टेन्शन वाढले! किआ लॉन्च करणार स्टायलिश SUV, पहा व्हिडीओ

किआ कार कंपनी त्यांची नवीन एसयूव्ही कार लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि तीन इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे.

0

Upcoming Sonet Facelift : किआ कार उत्पादक कंपनीकडून लवकरच आणखी एक नवीन एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. कंपनीकडून या नवीन एसयूव्ही कारचा पहिला व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये कारचा फ्रंट लूक दिसत आहे.

किआ कार उत्पादक कंपनी त्यांच्या Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च करणार आहे. १४ डिसेंबर रोजी ही कार जागतिक बाजारपेठेत सादर केली जाणार असून कारचे बुकिंग देखील याच वेळी सुरु केले जाणार आहे.

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारच्या डिझाईनमध्ये अनेक बदल पाहायला मिळू शकतात. २०२० मध्ये किआने त्यांची Sonet एसयूव्ही कार भारतात लॉन्च केली होती. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Sonet एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7.79 लाख रुपये आहे. ही कार Venue, Tata Nexon, Maruti Suzuki Brezza, Mahindra XUV300, Renault Kiger आणि Nissan Magnite सारख्या एसयूव्ही कारशी स्पर्धा करते.

सोनेट फेसलिफ्टची सुरक्षा वैशिष्ट्ये

किआ त्यांच्या आगामी Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त सुरक्षा फीचर्स देऊ शकते. कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक ब्रेक वितरण, आपत्कालीन स्टॉप सिग्नल, ब्रेक असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), वाहन स्थिरता व्यवस्थापन (VSM) आणि अँटिलॉक ब्रेक सिस्टम (ABS) सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. तसेच महत्वाचे म्हणजे 6 एअरबॅग देखील कारमध्ये दिल्या जाणार आहेत.

किआ Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये स्मार्ट क्रूझ कंट्रोल विथ स्टॉप अँड गो, फ्रंट कोलिजन वॉर्निंग (FCW), लेन कीप असिस्ट, रिअर ब्लाइंड स्पॉट कोलिशन अवॉयडन्स आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग अशी वैशिष्ट्ये मिळू शकतात.

किआ सोनेट फेसलिफ्ट इंजिन

किआ sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये तीन इंजिन पर्याय दिले जातील कारमध्ये पहिले 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 82 bhp पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

कारमध्ये दुसरे 1-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय देखील दिला जाईल जे 118 bhp पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच तिसरे 1.5-लिटर डिझेल इंजिन असेल जे 114 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.