Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Sub Compact SUV : टाटा ते महिंद्रापर्यंत 2024 मध्ये लॉन्च करणार या 4 सब-कॉम्पॅक्ट SUV, पहा यादी

नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी २०२४ मध्ये आणखी नवीन एसयूव्हीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. टाटा ते महिंद्रापर्यंतच्या अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या नवीन कार सादर करणार आहे.

0

Upcoming Sub Compact SUV : भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता अनेक कार कंपन्या त्यांच्या नवीन कार सादर करत आहेत. २०२४ हे नवीन वर्ष ऑटो क्षेत्रासाठी खास ठरणार आहे.

2024 मध्ये अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या 5 सब-कॉम्पॅक्ट SUV कार लॉन्च करणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आणखी नवीन एसयूव्ही कारचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये काही कार सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Kia Sonet Facelift

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल भारतीय ऑटो मार्केटमध्ये २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. Sonet एसयूव्ही कार २०२० मध्ये भारतात लॉन्च करण्यात आली होती. नवीन कारमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, नवीन हेडलाइट लेआउट आणि पुन्हा डिझाइन केलेले डेटाइम रनिंग लाइट्स आणि फॉग लॅम्प मिळण्याची शक्यता आहे.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

 

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांच्या XUV300 फेसलिफ्ट कारची चाचणी सुरु केली आहे. ही कार अनेकदा चाचणी दम्यान दिसून आली आहे. कारमध्ये अनेक बदल केल्याचे पहायला मिळाले आहे. कारच्या डिझाईनपासून फीचर्सपर्यंत बदल करण्यात आले आहेत.

टाटा पंच EV

टाटा मोटर्सने पंच एसयूव्ही कार अगदी कमी बजेटमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. सध्या पंच कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी पर्याय देण्यात आला आहे. आता लवकरच पंच कारमध्ये EV पर्याय देखील पहायला मिळू शकतो. Gen 2 Sigma आर्किटेक्चरवर ही कार तयार केली जाईल. सिंगल चार्जमध्ये 300 किमी रेंज देण्यास सक्षम असलेला बॅटरी पॅक कारमध्ये दिला जाईल.

टोयोटा Taisor

उत्पादक कंपनीकडून देखील २०२४ मध्ये त्यांची नवीन सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार Taisor सादर केली जाणार आहे. ही कार मारुती सुझुकी Fronx कारवर आधारित असणार आहे. Fronx कारसारखेच फीचर्स या कारमध्ये देखील पाहायला मिळू शकतात.