Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming SUV Cars : बजेट तयार ठेवा! सणासुदीच्या काळात लॉन्च होणार 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील शानदार SUV, पहा यादी

भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत. या कार १० लाख रुपयांच्या किमतीमध्ये सादर केल्या जाऊ शकतात.

0

Upcoming SUV Cars : भारतीय ऑटो बाजारात अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार लॉन्च झाल्या आहेत. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ होत असल्याने आणखी नवीन एसयूव्ही लवकरच बाजारात लॉन्च होणार आहेत. यामध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या एसयूव्ही कारचा समावेश आहे.

सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे या काळात अनेकजण नवीन कार खरेदी करत असतात. या सणासुदीच्या हंगामात अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या नवीन कार सादर करणार आहेत. एसयूव्ही कारच्या वाढत्या मागणीमुळे कार कंपन्यांकडून त्यांच्या नवीन एसयूव्ही लॉन्च केल्या जाणार आहेत.

तुम्हीही नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी येत्या काळात आणखी नवनवीन एसयूव्ही कार उपलब्ध होऊ शकतात. या आगामी एसयूव्ही कारच्या किमती देखील जास्त नसतील असा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे कमी किमतीतील शानदार एसयूव्ही तुम्ही खरेदी करू शकता.

टाटा सफारी फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून त्यांची आणखी नवीन एसयूव्ही कार सादर केली जाणार आहे. सफारी फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच लॉन्च होणार आहे. या कारची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहे. आता लवकरच सणासुदीच्या हंगामात सफारीचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च होणार आहे. कारमध्ये अनेक कॉस्मेटिक आणि मेकॅनिकल बदल केले जाणार आहेत. ही कार अनेकदा चाचणीदरम्यान स्पॉट झाली आहे.

टाटा हॅरियर फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून हॅरियर फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले जाणार आहे. तसेच हॅरियर इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च केली जाणार आहे. हॅरियर फेसलिफ्ट कारच्या इंजिनमध्ये काहीही बदल केला जाणार आहे. कारच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये बदल केले जाणार आहेत. लवकरच ही कार लॉन्च केली जाऊ शकते.

बोलेरो निओ प्लस

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची बोलेरो निओ प्लस एसयूव्ही कार देखील लॉन्च केली जाणार आहे. महिंद्राकडून त्यांच्या कारबाबत कोणतीही माहिती उघड केलेली नाही. मात्र लवकरच ही कार लॉन्च केली जाणार आहे. ही कार सुरुवातीच्या १० लाख रुपयांच्या किमतीमध्ये सादर केली जाऊ शकते. कारमध्ये अनेक मानक फीचर्स मिळू शकतात.