Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming SUV Cars : भारतात लॉन्च होणार या शक्तिशाली एसयूव्ही कार! पहा कार यादी आणि लॉन्च तारीख

भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये आणखी काही धमाकेदार आणि शक्तिशाली एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत. त्यामुळे कार खरेदीदारांना आणखी नवीन एसयूव्ही कारचा पर्याय मिळणार आहे.

0

Upcoming SUV Cars : भारतीय ऑटो बाजारात या जुलै महिन्यामध्ये अनेक कार आणि बाईक्स लॉन्च होणार आहेत. तसेच भारतामध्ये एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कंपन्यांकडून अनेक नवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जात आहेत.

सध्या प्रवासी वाहनांपैकी 50 टक्क्यांहून अधिक एसयूव्ही वाहनांची विक्री झाली आहे. भारतामध्ये एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने कंपन्यांकडून एसयूव्ही कार निर्मितीवर भर दिला जात आहे. आगामी काळात भारतीय ऑटो क्षेत्रात अनेक एसयूव्ही कार पदार्पण करणार आहेत. त्यामुळे ग्राहक नवीन एसयूव्ही कारचा पर्याय निवडू शकतात.

खालील एसयूव्ही कार लवकरच होणार लॉन्च

1. citroen c3 aircross

फ्रेंच ऑटो कंपनी citroen कडून त्यांची आणखी एक एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. ही SUV कार आगोदरच देशात सादर करण्यात आली आहे. आता कंपनीकडून citroen c3 aircross एसयूव्ही कार ऑगस्टमध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाहन निर्माता कंपनी Citroen C3 Aircross CMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. कंपनीच्या C Cubed प्लॅटफॉर्ममधील हे दुसरे उत्पादन आहे जे लवकरच भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे. ही एक माध्यम आकाराची SUV कार असणार आहे.

2. होंडा एलिव्हेट

होंडा कंपनीच्या अनेक कार सध्या भारतीय ऑटो क्षेत्रांध्ये वर्चस्व गाजवत आहेत. आता जपानी ऑटोमेकर होंडा कंपनीकडून त्यांची आणखी एक एलिव्हेट एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे. ६ जून रोजी कंपनीकडून ही सादर करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही कार लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

3. ह्युंदाई एक्स्टर

दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाई कडून त्यांची आणखी एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही लॉन्च केली जाणार आहे. 10 जुलै रोजी ही कार भारतामध्ये लॉन्च केली जाणार आहे. जर तुम्हालाही ही कार खरेदी करायची असेल तर तुम्ही ११ हजार रुपयांमध्ये ही कार बुक करू शकता.