Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming SUVs 2024 : भारतात लॉन्च होणार या 4 डॅशिंग SUVs, मिळणार हे प्रीमियम फीचर्स

भारतीय ऑटो मार्केटमध्ये आणखी ४ नवीन एसयूव्ही दाखल होणार आहेत. लवकरच या एसयूव्ही कार रस्त्यावर धावताना पाहायला मिळतील.

0

Upcoming SUVs 2024 : देशात एसयूव्ही कार खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल पाहायला मिळत आहे. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता अनेक कार उत्पादक कंपन्या त्यांच्या २०२४ मध्ये नवीन एसयूव्ही कार लॉन्च करणार आहेत.

टाटा Curvv

टाटा मोटर्सकडून २०२४ मध्ये त्यांच्या दमदार एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. यामध्ये Curvv एसयूव्ही कारचा देखील समावेश आहे. Curvv एसयूव्ही कार सर्वात प्रथम इलेक्ट्रिक रूपात सादर केली जाणार आहे.

Curvv इलेक्ट्रिक कारमध्ये जबरदस्त बॅटरी पॅक दिला जाणार असून सिंगल चार्जमध्ये ही कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. Curvv एसयूव्ही कारमध्ये ADAS तंत्रज्ञान, 360-डिग्री कॅमेरा, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 12.3-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, हवेशीर जागा, स्टीयरिंग व्हीलवर टाटाचा नवीन लोगो दिला जाणार आहे.

महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या XUV300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल देखील २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. कारमध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. कार चाचणी करताना रस्त्यावर दिसून आली आहे.

कारमध्ये नवीन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, ADAS तंत्रज्ञान आणि पॅनोरॅमिक सनरूफ असे फीचर्स मिळतील. XUV300 फेसलिफ्ट एसयूव्हीमध्ये फ्रंट ग्रिल, C-आकाराचे एलईडी हेडलॅम्प, नवीन अलॉय व्हील्स, अपडेटेड रीअर बंपर आणि टेलगेट मिळणार आहे.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्सकडून लवकरच त्यांची क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कार देखील सादर केली जाणार आहे. क्रेटा फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत. तसेच लेव्हल २ ADAS सुरक्षा वैशिष्ट्ये देखील कारमध्ये दिले जाणार आहे. कारमध्ये डिजिटल 10.25-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले दिला जाईल.

Sonet फेसलिफ्ट

किआ कार कंपनीकडून देखील त्यांच्या Sonet एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल सादर केले जाणार आहे. 14 डिसेंबर रोजी ही कार जागतिक बाजारपेठेत सादर केली जाणार असून कारचे बुकिंग देखील सुरु केले जाणार आहे. कारमध्ये कॉस्मेटिक अपडेट्स पाहायला मिळतील.

Sonet फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये नवीन फ्रंट आणि रियर बंपर, LED DRLs, अपडेटेड फॉक्स स्किड प्लेट, नवीन अलॉय व्हील आणि एक नवीन फ्रंट ग्रिल पाहायला मिळेल. ADAS सुरक्षा फीचर्स देखील कारमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे.