Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming SUVs Cars In 2024 : भारतात लॉन्च होणार या 3 SUVs! Creta, Sonet फेसलिफ्टचा समावेश

भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कारला प्रचंड मागणी आहे. येत्या काळात आणखी नवीन एसयूव्ही कार देखील लाँच होणार आहेत. यामध्ये creta फेसलिफ्टचा देखील समावेश आहे.

0

Upcoming SUVs Cars In 2024 : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अशा काळात सर्वच ऑटो कार कंपन्यांच्या SUVs च्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात आणखी नवीन SUVs कार भारतात लॉन्च होणार आहेत.

सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ लक्षात आता आणखी Creta फेसलिफ्ट, Sonet फेसलिफ्ट आणि महिंद्रा थार ५ डोअर एसयूव्ही कार २०२४ मध्ये लाँच होणार आहेत.

महिंद्रा थार 5-डोअर

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची थार ५ डोअर एसयूव्ही कार २०२४ मध्ये लाँच केली जाणार आहे. या कारचे ३ डोअर व्हेरियंट सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ३ डोअर थारपेक्षा ५ डोअर थारमध्ये अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.

महिंद्रा थार ५ डोअर एसयूव्ही कारमध्ये जबरदस्त फिचर्स देण्यात येतील. तसेच थार एसयूव्ही कारमध्ये 2.2L टर्बो डिझेल किंवा 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येईल. नवीन थार ×2 आणि 4×4 ड्राइव्हट्रेन पर्यायांसह ऑफर केली जाईल असा दावा करण्यात येत आहे.

नवीन-जनरेशन ह्युंदाई क्रेटा

ह्युंदाई कार उत्पादक कंपनीकडून त्यांची लोकप्रिय एसयूव्ही कार क्रेटा फेसलिफ्ट २०२४ मध्ये लॉन्च केली जाणार आहे. या कारमध्ये डिझाईनसह अनेक कॉस्मेटिक बदल केला जाणार आहे. नवीन क्रेटा कारमध्ये 1.5-लीटर NA टर्बो-पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता आहे.

हे इंजिन 160 hp पॉवर जननरेट करण्यास असेल असा दावा करण्यात येत आहे. क्रेटा एसयूव्ही कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे. कारमध्ये नवीन आकर्षक अलॉय व्हील्स पाहायला मिळतील.

किआ सोनेट फेसलिफ्ट

किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांचा भारतीय ऑटो क्षेत्रातील विस्तार वाढवण्यासाठी त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार सादर केल्या जात आहेत. आता किआ कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Sonet Facelift एसयूव्ही कार सादर केली जाणार आहे.

किआ सोनेट फेसलिफ्ट एसयूव्ही कार चाचणी दरम्यान अनेकदा स्पॉट झाली आहे. sonet facelift कारमध्ये ड्युअल-टोन अलॉय व्हील, शार्क-फिन अँटेना आणि हाय-माउंट स्टॉप लॅम्पचा नवीन सेट दिला जाण्याची शक्यता आहे. Sonet फेसलिफ्ट कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या कारमध्ये 1.2-लिटर NA पेट्रोल इंजिन, 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.