Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming SUVs In 2024 : मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्रा आणि किआ लॉन्च करणार जबरदस्त SUVs ! पहा यादी

नवीन एसयूव्ही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा. कारण २०२४ मध्ये भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक कार कंपन्यांच्या जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत.

0

Upcoming SUVs In 2024 : देशातील ऑटो मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ग्राहकांमध्ये सध्या एसयूव्ही कार खरेदी करण्याचा ट्रेंड सुरु आहे. तसेच देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून 2024 मध्ये त्यांच्या दमदार एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

1. ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्युंदाई मोटर्स लवकरच त्यांच्या क्रेटा एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये लॉन्च केले जाणार आहे. या कारमध्ये अनके बदल पाहायला मिळू शकतात. तसेच कारच्या डिझाईनमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. ही कार चाचणी दरम्यान रस्त्यावर दिसून आली आहे. कारमध्ये 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.

2. टाटा कर्व

टाटा मोटर्स २०२४ मध्ये त्यांची नवीन संकल्पनेवर आधारित कर्व एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे. ही कार सर्वात प्रथम इलेक्ट्रिक आणि नंतर पेट्रोल व्हेरियंटमध्ये सादर केली जाईल. Curvv इलेक्ट्रिक कार 500 किमीपेक्षा जास्त रेंज देईल असा दावा करण्यात येत आहे. Creta, Kia Seltos, Maruti Suzuki Grand Vitara आणि Hyryder कारशी स्पर्धा करेल. कारमध्ये 1.5L TGDI पेट्रोल इंजिन दिले जाईल.

3. किआ सोनेट फेसलिफ्ट

किया कार उत्पादक कंपनीच्या सोनेट कारचे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केले जाईल. ही कार चाचणी दरम्यान अनेकदा स्पॉट झाली आहे. सोनेट फेसलिफ्ट कारमध्ये 1.2L NA पेट्रोल, 1.0L टर्बो पेट्रोल आणि 1.5L टर्बो डिझेल इंजिन कायम ठेवले जाईल.

4. नवीन-जनरल मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायर

मारुती सुझुकी कार उत्पादक कंपनीची स्विफ्ट आणि डिझायर सेडान कार २०२४ मध्ये लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये स्विफ्ट सेडान कार सादर केली आहे. या नवीन कारमध्ये 1.2L Z सिरीज इंजिन दिले जाईल. तसेच कारला हायब्रीड इंजिन देखील दिले जाईल.

5. महिंद्रा XUV300 फेसलिफ्ट आणि 5-डोअर थार

महिंद्रा कार निर्मात्या कंपनीच्या दोन जबरदस्त एसयूव्ही कार २०२४ मध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत. महिंद्राची फेसलिफ्टेड XUV300 आणि थार ५ डोअर एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. कारमध्ये नवीन फीचर्स जोडले जाणारा आहेत. तसेच डिझाईनमध्ये देखील थोडाफार बदल पाहायला मिळू शकतो.