Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming SUVs In India : महिंद्रा ते टोयोटा लॉन्च करणार या डॅशिंग SUVs ! पहा आगामी कारची खासियत

0

Upcoming SUVs In India : देशात सध्या एसयूव्ही कार खरेदीसाठी ग्राहकांची चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. देशातील ऑटो मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या एसयूव्ही कार उपलब्ध आहेत. मात्र अनेक कार उत्पादक कंपन्यांकडून त्यांची एसयूव्ही कार सेगमेंटमधील मजबूत पकड निर्माण करण्यासाठी त्यांच्या नवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत.

एसयूव्ही कारच्या मागणतील वाढ लक्षात घेता टाटा मोटर्स, महिंद्रा आणि टोयोटा या कार निर्मात्या कंपन्यांकडून त्यांच्या जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. तुम्हालाही नवीन एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर आगामी एसयूव्ही कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

टाटा मोटर्स Curvv  SUV

टाटा मोटर्सकडून त्यांच्या 2024 या नवीन वर्षात अनेक नवीन एसयूव्ही कार लॉन्च केल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना टाटा मोटर्सच्या अनेक नवीन एसयूव्ही कारचा पर्याय मिळणार आहे.

टाटाने 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये Curvv एसयूव्ही कार सादर केली होती. आता 2024 मध्ये टाटा या कारचे इलेक्ट्रिक अंडी पेट्रोल मॉडेल सादर करणार आहे. ही कार Gen 2 आर्किटेक्चरच्या डिझाइनवर तयार करण्यात आली आहे.

टोयोटा Taisor

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या अनेक आलिशान एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. आता टोयोटा कार कंपनी त्यांच्या मारुती सुझुकी Fronx कारवर आधारित Taisor एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

Taisor एसयूव्ही कारमध्ये 1.2-लीटर 4-सिलेंडर नैसर्गिकरित्या-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.0-लिटर 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. टोयोटा आणि मारुती सुझुकी या कार कंपन्यांच्या भागीदारीतून त्यांच्या अनेक कार सादर करण्यात आल्या आहेत.

Mahindra BE.05 इलेक्ट्रिक SUV

महिंद्रा कार उत्पादक कंपनीकडून त्यांचा भारतीय ऑटो क्षेत्रातील इलेक्ट्रिक सेगमेंट मजबूत करण्यासाठी आणखी नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही कार सादर केल्या जाणार आहेत. 2026 पर्यंत महिंद्रा आर कंपनी त्यांच्या 5 इलेक्ट्रिक एसयूव्ही कार लॉन्च करणार आहे.

महिंद्राकडून BE.05 इलेक्ट्रिक SUV लवकरच लॉन्च केली जाणार आहे. स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर ही एसयूव्ही कार विकसित केली जाईल. नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये 60kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.