Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming SUVs In India : टाटा नेक्सॉन फेसलिफ्टसह लॉन्च होणार ‘या’ जबरदस्त SUV, मिळणार लक्झरी फीचर्स, पहा यादी

भारतीय ऑटो क्षेत्रासाठी येणार काळ खास ठरू शकतो. कारण टाटा मोटर्सकडून त्यांच्या ४ जबरदस्त एसयूव्ही आणि Citroen ची ७ सीटर कार लॉन्च केली जाणार आहे.

0

Upcoming SUVs In India : देशात लवकरच सणासुदीचा हंगाम सुरु होणार आहे. या काळात अनेक नवीन ग्राहक कार खरेदी करत असतात. त्यामुळे अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या नवीन कार या काळात लॉन्च करतात. आता टाटा मोटर्ससह अनेक कंपन्या त्यांच्या एसयूव्ही कार सादर करणार आहेत.

भारतीय ऑटो बाजारात सणासुदीच्या काळात आणखी ५ जबरदस्त एसयूव्ही कार लॉन्च होणार आहेत. कंपन्याकडून त्यांच्या एसयूव्ही कार आगोदरच सादर करण्यात आल्या आहेत. येत्या काळात या एसयूव्ही लॉन्च होऊ शकतात.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट आणि नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट

टाटा मोटर्सकडून त्यांच्या अनेक एसयूव्ही कार आगामी काळात लॉन्च केल्या जाणार आहेत. नेक्सॉन फेसलिफ्ट आणि नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट या दोन कार उद्या १४ सप्टेंबर रोजी लॉन्च केल्या जाणार आहेत.

टाटा मोटर्सकडून उद्या या दोन्ही कारच्या किमती जाहीर केल्या जाणार आहेत. या दोन्ही एसयूव्ही कर्व्ह संकल्पनेपासून प्रेरित असणार आहेत. कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन फीचर्ससह ग्राहकांना या कार सादर केल्या जाणार आहेत.

टाटा नेक्सॉन फेसलिफ्ट आणि नेक्सॉन ईव्ही फेसलिफ्ट कारमध्ये 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्लिमर HVAC व्हेंट्स, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (Nexon EV फेसलिफ्टमध्ये 12.3-इंच मोठी टचस्क्रीन आहे), 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री. कॅमेरा सिस्टीम अशी वैशिष्ट्ये दिली जाणार आहेत.

Citroen C3 एअरक्रॉस

भारतीय ऑटो मार्केटमध्ये आणखी एक स्वस्त ७ सीटर कार लवकरच लॉन्च होणार आहे. Citroen C3 एअरक्रॉस लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. ही कार 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. हे इंजिन 110 PS पॉवर आणि 190 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. या कारचे बकिंग थोड्याच दिवसांत सुरु होईल आणि पुढील महिन्यात कंपनीकडून या कारच्या किमती जाहीर केल्या जाऊ शकतात.

टाटा हॅरियर फेसलिफ्ट आणि सफारी फेसलिफ्ट

 

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आणखी दोन एसयूव्ही कार लवकरच लॉन्च केल्या जाऊ शकतात. हॅरियर फेसलिफ्ट आणि सफारी फेसलिफ्ट अशा या दोन कार असणार आहेत. ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये हॅरियर फेसलिफ्ट EV पाहायला मिळाली आहे. या कारमध्ये अनेक नवीन बदल केले गेले आहेत. तसेच सफारी फेसलिफ्ट देखील नवीन बदलांसह लवकरच लॉन्च केली जाऊ शकते.