Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

SUV खरेदी करायचीय? थोडं थांबा, ‘या’ दिवशी लॉन्च होत आहेत देशातील सर्वात भारी कार्स ; पहा फोटो । Upcoming SUVs In India

काही दिवसात भारतीय ऑटो बाजारात ह्युंदाई पासून होंडा पर्यंत एसयूव्ही कार्स लाँच होणार आहे . चला मग जाणून घेऊया येत्या काही दिवसात भारतीय ऑटो बाजारात कोणत्या कोणत्या एसयूव्ही कार्स लाँच होणार आहे.

0

Upcoming SUVs In India :  जर तुम्ही तुमच्यासाठी नवीन एसयूव्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो  भारतीय ऑटो बाजारात जुलै-ऑगस्ट या महिन्यात एकापेक्षा एक 3 मस्त एसयूव्ही कार्स लाँच होणार आहे. ज्यांना तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये  खरेदीचा विचार करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि येत्या काही दिवसात भारतीय ऑटो बाजारात ह्युंदाई पासून होंडा पर्यंत एसयूव्ही कार्स लाँच होणार आहे . चला मग जाणून घेऊया येत्या काही दिवसात भारतीय ऑटो बाजारात कोणत्या कोणत्या एसयूव्ही कार्स लाँच होणार आहे.

Hyundai EXTER

Hyundai Motor 10 जुलै 2023 रोजी भारतात तिची सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट SUV लॉन्च करणार आहे. थेट टाटा पंचला कडवी टक्कर देईल. नवीन EXTER मध्ये तुम्हाला केवळ स्टायलिश डिझाईनच पाहायला मिळणार नाही, तर त्यात स्पेस आणि फीचर्सची कमतरता भासणार नाही.

एवढेच नाही तर ती 3 पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. नवीन Hyundai EXTER फक्त 11,000 रुपये भरून बुक करता येते. नवीन Hyundai EXTER तीन पॉवरट्रेन पर्यायांसह ऑफर केली जाईल, ज्यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले 1.2L कप्पा पेट्रोल इंजिन (E20 इंधन तयार) समाविष्ट असेल. याशिवाय, यात 1.2 l द्वि-इंधन कप्पा पेट्रोल आणि CNG पर्याय देखील मिळेल. कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि स्मार्ट ऑटो AMT गिअरबॉक्सचा पर्याय देखील मिळेल. यात 5 व्हेरियंट मिळतील ज्यात EX, S, SX, SX(O) आणि SX(O) Connect यांचा समावेश असेल.

Honda Elevate

Honda Cars India ने या वर्षी 6 जून रोजी आपल्या नवीन SUV Elevate चे अनावरण केले आहे. मात्र त्याची किंमत त्यावेळी जाहीर करण्यात आली नव्हती. पण सूत्रानुसार, होंडा ऑगस्ट महिन्यात लॉन्च करू शकते. या नवीन मॉडेलची फ्रंट डिझाईन बोल्ड आहे आणि खूप प्रभावित करते. ही कार क्रेटा, सेल्टोस आणि ग्रँड विटारा या कारला टक्कर देईल. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन Honda Elevate SUV मध्ये 1.5-liter DOHC i-VTEC इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 119hp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते. एलिव्हेटमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सारखे ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत.

Citroen C3 Aircross

फ्रेंच ऑटोमेकर Citroen ऑगस्ट महिन्यात आपली नवीन C3 aircross SUV लाँच करण्याच्या तयारीत आहे. माहितीसाठी नवीन Citroen C3 Aircross CMP मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे.

कंपनीच्या C Cubed प्रोग्रामचे हे दुसरे उत्पादन आहे, पुढील महिन्यात ते कोणत्या तारखेला आणले जाईल याबद्दल कोणतीही माहिती नाही. अशीही बातमी आहे की C3 एअरक्रॉस सध्याच्या कारपेक्षा खूप लांब आहे आणि तिचा व्हीलबेस जास्त आहे आणि मिड साइजच्या SUV स्पेसमध्ये प्रवेश करणार आहे.