Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Tata Sumo : टाटा सुमो पुन्हा होणार लॉन्च! या मोठ्या बदलांसह मिळणार नवीन डिझाईन

टाटा मोटर्स आगामी काळात त्यांची सुमो MPV कार लाँच करण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळाले आहेत. लवकरच टाटा मोटर्स नवीन सुमो एसयूव्ही कारबद्दल अधिकृत माहिती देऊ शकते.

0

Upcoming Tata Sumo : टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार देशातील ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या जात आहेत. त्यांच्या या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्स आता त्यांची सुमो एसयूव्ही कार पुन्हा एकदा भारतात लॉन्च करणार आहे.

देशातील ऑटो मार्केटमध्ये ७ सीटर MPV कारच्या मागणीत वाढ होत असताना आता टाटा मोटर्स त्यांची लोकप्रिय ७ सीटर एसयूव्ही सुमो लवकरच सादर करू शकते. सुमो एसयूव्ही मोठे बदल केले जाणार आहेत.

टाटा मोटर्सच्या एमडीने त्यांच्या आगामी ७ सीटर MPV कारबाबत संकेत दिले आहेत. टाटाची आगामी ७ सीटर एसयूव्हीला सुमो नाव दिले जाण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सचे एमडी शैलेश चंद्रा यांनी सांगितले की, त्यांच्याकडे एंट्री लेव्हल हॅचबॅक, कॉम्पॅक्ट सेडान, प्रीमियम हॅचबॅक, कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि हॅरियर आणि सफारी सारख्या मध्यम आकाराच्या एसयूव्ही उपलब्ध आहेत.

मात्र ७ सीटर MPV कार सेगमेंटमध्ये त्यांच्या जास्त पर्याय नाहीत. टाटा मोटर्स लवकरच त्यांची Curvv एसयूव्ही देखील सादर करणार आहे. अलीकडेच टाटा मोटर्सने हॅरियर ७ सीटर MPV कार सादर केली आहे. आता यानंतर टाटा मोटर्स सुमो ७ सीटर एसयूव्ही कार सादर करू शकते.

टाटा मोटर्सकडून त्यांचा MPV सेगमेंट मजबूत करण्यासाठी त्यांच्या नवीन ७ सीटर कार सादर करत आहे. आता टाटा मोटर्स Sumo एसयूव्ही मोठ्या बदलांसह पुन्हा एकदा बाजारात लाँच करू शकते.

कारमध्ये नवीन पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे. डीआरएलसह सर्व एलईडी लाइटिंग सेटअपसह सुमो MPV कार सादर केली जाऊ शकते. कारला स्टायलिश लूक देण्यासाठी टाटा डिझाईनमध्ये देखील बदल करू शकते.

टाटा MPV सुमो वैशिष्ट्ये

आता मोटर्स त्यांची आगामी काळात Sumo MPV कार सादर करू शकते. या कारमध्ये 12.3-इंच किंवा 10.25-इंच टचस्क्रीन सिस्टम, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, टच-आधारित AC नियंत्रणे आणि प्रकाशित Tata लोगोसह 2-स्पोक किंवा 4-स्पोक स्टीयरिंग व्हील सारखी वैशिष्ट्ये देऊ शकते.

तसेच कारमध्ये एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प, लेदरेट अपहोल्स्ट्री, अॅम्बियंट लाइटिंग, जेबीएल स्पीकर्स, सनरूफ, पुरेशी स्टोरेज स्पेस असे फीचर्स देखील मिळू शकतात.

टाटाची नवीन सुमो कधी होणार लाँच?

टाटा मोटर्सकडून त्यांची नवीन सुमो एसयूव्ही कार 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्सने MPV सेगमेंट मजबूत करण्यासाठी योजना आखल्याचे समजत आहे.

टाटा मोटर्स त्यांच्या पहिल्या कारला पुनर्जन्म देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करण्यात येत आहे. टाटा मोटर्स नवीन सुमो एसयूव्हीमध्ये कोणते बदल करणार याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.