Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Toyota Car : टोयोटाचा बिग प्लॅन! नवीन Fortuner सह लॉन्च करणार आणखी जबरदस्त कार…

टोयोटाकडून आगामी अनेक कार लॉन्च करण्याचा मोठा प्लॅन आखला आहे. यामध्ये एका इलेक्ट्रिक कारचा देखील समावेश आहे.

0

Upcoming Toyota Car : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या आणखी काही नवीन कार ऑटो मार्केटमध्ये लॉन्च केल्या जाणार आहेत. टोयोटाकडून या नवीन कार सादर करण्यासाठी मोठा प्लॅन तयार केल्याचे सांगितले जात आहे.

टोयोटाकडून नुकतीच मारुती सुझुकी एर्टिगावर आधारित Rumion MPV कार लॉन्च केली आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांचा या कारला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जोरदार बुकिंग मिळत असल्याने कंपनीकडून कारचे बुकिंग बंद करण्यात आले आहे.

टोयोटा भारतात नवीन सब-4 मीटर क्रॉसओवर 2024 मध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. तसेच टोयोटा आणि मारुती सुझुकी एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करू शकतात.

टोयोटा Taisor

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची आगामी Taisor एसयूव्ही कार लवकरच भारतात सादर केली जाऊ शकते. मारुती सुझुकी स्विफ्टवर आधारित क्रॉसओवर किंवा कूप एसयूव्ही लॉन्च करू शकते.

नवीन मॉडेलमध्ये टोयोटाची सिग्नेचर ग्रिल, नवीन बंपर, नवीन मिश्र धातु आणि विविध लाईट्स पाहायला मिळू शकतात. कारमध्ये दोन इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. 1.0 लीटर बूस्टरजेट पेट्रोल आणि 90bhp पॉवर असलेले 1.2 लीटर नॅचरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. तसेच कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही गिअरबॉक्सचा पर्याय दिला जाऊ शकतो.

नवीन जनरेशन टोयोटा फॉर्च्युनर

टोयोटाकडून नवीन जनरेशन फॉर्च्युनर कार लॉन्च केली जाऊ शकते. मात्र कंपनीकडून अद्याप या कारबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. फॉर्च्युनर ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही कार आहे. राजकारण्यांपासून ते गाव लेव्हलच्या पुढाऱ्यांपर्यंत या कारची क्रेझ पाहायला मिळत आहे.

नवीन फॉर्च्युनर TNGA-F आर्किटेक्चरवर तयार केली आजू शकते. तसेच कारच्या इंटीरियरमध्ये बरेच बदल होऊ शकतात. तसेच कारमध्ये नवीन 1 GD FTV 2.8 लीटर डिझेल इंजिन मिळू शकते. तर नवीन 2.4 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 2.4 लीटर हायब्रिड टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते.

नवीन टोयोटा ईव्ही

टोयोटाच्या इलेक्ट्रिक कारचा देखील यामध्ये समावेश आहे. टोयोटा त्यांची EVX इलेक्ट्रिक SUV लवकरच लॉन्च करू शकते. इलेक्ट्रिक कारचे नवीन मॉडेल 2024-25 आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी लॉन्च होऊ शकते.