Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Upcoming Toyota Taisor : टोयोटा लॉन्च करणार लक्झरी कार, मिळणार जबरदस्त इंजिन आणि हे उत्कृष्ट फीचर्स

टोयोटा कार उत्पादक कम्पनीकडून आता त्यांची आणखी नवीन आलिशान कार लवकरच भारतात सादर केली जाणार आहे. कारमध्ये प्रीमियम फीचर्स जोडले जाणार आहेत.

0

Upcoming Toyota Taisor : टोयोटा कार उत्पादक कंपनीच्या अनेक आलिशान कार सध्या भारतीय ऑटो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टोयोटा आणि मारुतीच्या भागीदारीतून अनेक कार सध्या ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आल्या आहेत.

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून आता मारुती सुझुकी Fronx कारवर आधारित त्यांची नवीन लक्झरी फीचर्स कार सादर करणार आहे. लवकरच कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाईल.

मारुती सुझुकी कार निर्मात्या कंपनीबरोबर भागीदारी करून टोयोटाला भारतीय ऑटो बाजारात खूप मोठा फायदा झाला आहे. टोयोटा आणि मारुतीने एकमेकांच्या कारवर आधारित नवीन कार सादर केल्या आहेत.

मारुती सुझुकी Fronx कारवर आधारित टोयोटा त्यांची Taisor कार सादर करणार आहे. कंपनीकडून या कारवर काम सुरु केले असल्याची माहिती मिळत आहे. ही कार लाँच करून टोयोटा कार कंपनीला मोठा फायदा होणार आहे.

Toyota Taisor अपेक्षित लॉन्च टाइमलाइन

टोयोटाकडून त्यांची Taisor कार आगामी काळात सादर केली जाईल. पुढील वर्षाच्या पहिल्या ३ महिन्यात Taisor कार सादर केली जाणायचा दावा करण्यात येत आहे. अर्बन क्रूझर Taisor असे या कारचे नाव असू शकते. कंपनीकडून या कारचे नाव अॅप्लिकेशनमध्ये सादर केले आहे.

Toyota Taisor अपेक्षित इंजिन तपशील

Taisor कारमध्ये 1.2-लिटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड ड्युअल जेट आणि 1.0-लीटर बूस्टरजेट टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारचे पहिले इंजिन पहिले इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT गिअरबॉक्सशी जोडलेले असेल जे 89 bhp आणि 113 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

तसेच कारचे दुसरे 1.0-लीटर बूस्टरजेट टर्बोचार्ज केलेले पेट्रोल इंजिन 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले असेल. हे इंजिन 99 bhp आणि 147 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच कारमध्ये सीएनजी पर्याय देखील पाहायला मिळू शकतो.

Toyota Taisor अपेक्षित वैशिष्ट्ये

टोयोटा कार कंपनीकडून त्यांच्या Taisor एसयूव्ही कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी, मध्यभागी रंगीत MID सह अर्ध-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, हेड-अप डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच वायरलेस फोन चार्जर, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असे फीचर्स देखील कारमध्ये पाहायला मिळू शकतात.

तसेच नवीन टोयोटा Taisor कारमध्ये सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम, हिल-होल्ड असिस्ट, एक 360-डिग्री कॅमेरा, ISO निश्चित चाइल्ड सीट अँकर आणि EBD सह ABS असे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.