Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition : Creta, Harrier, Hyryder चे टेन्शन वाढले! Volkswagen लॉन्च केली जबरदस्त SUV, मिळणार हे खास फीचर्स

सध्या एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. एसयूव्ही कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता Volkswagen ने त्यांची शक्तिशाली इंजिनसह नवीन एसयूव्ही कार लॉन्च केली आहे.

0

Volkswagen Taigun GT Edge Trail Edition : टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांची शानदार शक्तिशाली एसयूव्ही कार भारतीय ऑटो बाजारात लॉन्च केली आहे. मात्र या कारचे टेन्शन वाढवण्यासाठी Volkswagen ने त्यांची शक्तिशाली इंजिनसह नवीन SUV कार लॉन्च केली आहे.

जर्मन कार उत्पादक Volkswagen कंपनीकडून त्यांची Taigun SUV कारचे GT Edge Trail Edition लॉन्च केले आहे. कंपनीकडून या नवीन एसयूव्ही कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 16.3 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

मिड साईझ एसयूव्ही कार सेगमेंटमध्ये Volkswagen ने त्यांची नवीन कार सादर केल्याने ग्राहकांना आणखी एका कारचा पर्याय उपलब्ध झाला आहे. Taigun एसयूव्ही कारचे नवीन मॉडेल Hyundai Creta, Maruti Suzuki Grand Vitara, Kia Seltos, Toyota Hyryder या एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल. तसेच भारतात अलीकडेच लॉन्च झालेल्या हॅरियर फेसलिफ्ट आणि Honda Elevate कारशी देखील नवीन Taigun ची स्पर्धा असेल.

डिझाइनमध्ये बदल करण्यात आला आहे.

Volkswagen कार उत्पादक कंपनीकडून त्यांची Taigun GT Edge Trail Edition नवीन डिझाईनसह लॉन्च केली आहे. पहिल्यापेक्षा कारला आणखी स्पोर्टी अपडेट देण्यात आले आहेत. ब्लॅक-आउट 17-इंच अलॉय व्हील कारचा लूक आणखी आकर्षक बनवते. कॅंडी व्हाइट, कार्बन स्टील ग्रे आणि रिफ्लेक्स सिल्व्हर या तीन रंग पर्यायामध्ये ही कार सादर करण्यात आली आहे.

Taigun GT Edge Trail Edition इंजिन

Volkswagen कार निर्मात्या कंपनीकडून त्यांच्या Taigun GT Edge Trail Edition या नवीन एसयूव्ही कारमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 150 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात आले असून यामध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला नाही.

नवीन Taigun एसयूव्हीचे इंटेरियर आणि वैशिष्ट्ये

नवीन Taigun एसयूव्ही कारच्या केबिनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. कारमध्ये कॉन्ट्रास्ट रेड स्टिचिंग आणि ‘ट्रेल’ एम्बॉसिंगसह ब्लॅक सीट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे.

नवीन एसयूव्ही कारमध्ये व्हिज्युअल रेकॉर्डरसह डॅशकॅम आणि 2-इंच बिल्ट-इन IPS LCD डिस्प्ले, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटीसह 10-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, मागील कॅमेरा, वायरलेस फोन चार्जिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, ऑटोमॅटिक हेडलॅम्प अशी वैशिषस्त्ये देण्यात आली आहेत.