Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Volkswagen Tiguan : Nexon आणि Creta ची अडचण वाढली! लॉन्च होणार लक्झरी फीचर्स SUV, देईल 30 मायलेज

ऑटो बाजारात आता आणखी एक लक्झरी फीचर्स कार लवकरच लॉन्च होणार आहे. ही कार लॉन्च होताच Nexon आणि Creta शी स्पर्धा करेल.

0

Volkswagen Tiguan : देशातील ऑटो बाजारात दिवसेंदिवस नवनवीन एसयूव्ही कार लॉन्च होत आहेत. अलीकडे टाटा मोटर्सकडून त्यांची लोकप्रिय कार नेक्सॉनचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. तसेच लवकरच ह्युंदाई मोटर्सकडून त्यांच्या क्रेटा कारचे नवीन मॉडेल सादर केले जाणार आहे.

काही महिन्यांपुवी लॉन्च झालेल्या किआच्या Seltos फेसलिफ्ट कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच अजूनही या कारचे बुकिंग जोरदार सुरु आहे. आता आणखी एक कंपनी त्यांची लक्झरी SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

फोक्सवॅगनने 2024 मध्ये त्यांची Tiguan कारचे हायब्रीड मॉडेल लॉन्च करणार आहे. जागतिक बाजारपेठेत या कारचे अनावरण 2024 मध्ये मार्चपूर्वी केले जाईल असा दावा केला जात आहे. या कारच्या डिझाईन आणि इंजिनमध्ये बदल पाहायला मिळतील.

काय बदल होतील?

नवीन Tiguan एसयूव्ही कारमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन मिळेल जे सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. हे इंजिन 131 BHP पॉवर जनरेट करेल. तसेच कारचे हे इंजिन हायब्रीडसह 150 BHP ची पॉवर जनरेट करेल. कारचे 2.0 लीटर पेट्रोल इंजिन देखील अपग्रेड केले जाईल. हे इंजिन 204 BHP पॉवर जनरेट करेल. हायब्रिड मोडमध्ये ही कार 100 किलोमीटरपर्यंत रेंज देण्यास सक्षम असेल.

उत्कृष्ट मायलेज मिळेल

Tiguan कारचे हायब्रीड मॉडेल तुम्हाला उत्कृष्ट मायलेज देण्यास सक्षम असेल. Tiguan कारचे हायब्रीड 1.5 लिटर पेट्रोल इंजिन 30 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम असू शकते. जर या कारने इतके मायलेज दिले तर हायब्रीड सेगमेंटमधील सर्वाधिक मायलेज देणारी पहिली कार Tiguan असेल. Tiguan मध्ये, तुम्हाला 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.

फीचर्सही उत्तम असतील

Tiguan कारमध्ये लक्झरी फीचर्स दिले जाऊ शकतात. या हायब्रीड व्हर्जन कारमध्ये 10.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि बॅकलिट स्लाइडर कंट्रोलरसह 12.9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल. डॅशबोर्डसह, नवीन कंट्रोल मॅट्रिक्स आणि एअर व्हेंट्सचे नवीन डिझाइन, एसी सीट, क्लायमेट कंट्रोल एसी, स्टीयरिंग कंट्रोल्स, 6 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, एलईडी हेडलॅम्प अशी वैशिष्ट्ये दिली जातील.