Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Winter Car Care Tips : हिवाळ्यात या कारणांमुळे साठते कारच्या काचेवर धुके, वापरा या टिप्स होईल फायदा

0

Winter Car Care Tips : हिवाळाच्या दिवसांत अनेकजण कारने प्रवास करत असतात. मात्र अशा दिवसांमध्ये बाहेरील वातावरणात दाट धुके असते. त्यामुळे अनेकदा कार चालवताना अडचणी येत असतात. दाट धुक्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता जास्त असते.

हिवाळ्यातील दाट धुक्यात कार चालवताना अनेक प्रकारची काळजी घेणे गरजेचे असते. जसे तुम्ही स्वतःची काळजी घेता तशी कारची काळजी घेणे देखील गरजेचे असते.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हिवाळ्याच्या दिवसांत कारच्या काचेवर वाफ का जमा होते. कारच्या काचेवर वाफ जमा होण्यापासून वाचण्यासाठी तुम्हालाही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

हिवाळ्यात कारच्या काचेवर वाफ का जमा होते?

कारच्या काचेवर फक्त हिवाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील अनेकदा वाफ जमा झाल्याचे पाहायला मिळते. कारच्या सर्व काचा बंद ठेऊन प्रवास केल्यानंतर अशा प्रकारची समस्या निर्माण होत असते.

कारच्या सर्व काचा बंद असल्याने त्यात कार्बन डायऑक्साइड साचतो त्यामुळे कारची काचाही थंड होतात. काही वेळाने कारच्या काचांवर धुके साठते आणि बाहेरील काहीही दिसत नाही. कार चालकाच्या समोरील दृश्यमानता कमी झाल्याने अपघात देखील होण्याची शक्यता खूप असते.

कारच्या काचांवर धुके साठू नये यासाठी वापरा खालील पद्धती

ब्लोअर सेटिंग

हिवाळ्यात अशी समस्या निर्माण झाल्यास, तुम्ही ब्लोअरवर विंडशील्ड सेट करू शकता, ज्यामुळे धुके बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

AC चालू करा

तुम्हीही हिवाळ्यात कार चालवताना तुमच्या कारच्या काचेवर धुके आल्यास तुम्ही AC चालू ठेऊ शकता. AC चालू केल्यानंतर कारच्या काचेवरील धुके हळूहळू नाहीसे होते.

खिडकी किंचित उघडी ठेवा

कार चालवताना काचेवर जास्त प्रमाणात धुके आल्यास तुम्ही कारच्या काचा थोड्या उघड्या ठेऊ शकता. कारच्या आता ऑक्सिजन आल्याने त्वरित काचेवरील धुके नाहीसे होते.

डिफॉगर वापरा

कारच्या काचांवरील धुके कमी करण्यासाठी डिफॉगर वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.