Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

Xiaoma Electric Car : फक्त एकदा चार्ज आणि 1200Km नो टेन्शन ! 3.47 लाखात आजच घरी आणा ही इलेक्ट्रिक कार…

तुम्ही ही इलेक्ट्रिक कार 3.47 लाख रुपयांच्या किमतीत घरी आणू शकता. ही कार एका चार्जवर 1200Km धावते.

0

Xiaoma Electric Car : जर तुम्ही स्वस्तात मस्त अशा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एक अशी कार सांगणार आहे जी तुम्ही टाटा नॅनोच्या किमतीत खरेदी करू शकता.

तसे पाहिले तर सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ज्यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्स, इलेक्ट्रिक बाइक्स, इलेक्ट्रिक कार वेगवेगळ्या कंपन्यांनी लॉन्च केल्या आहेत.

सध्या लोक प्रवासाला परवडणारी वाहने खरेदी करण्याकडे अधिक भर देत आहेत. अशा वेळी एका सामान्य कुटुंबाला छोटी आणि लांब पल्ल्याची इलेक्ट्रिक कार हवी असते. आत्तापर्यंतची सर्वसामान्य लोकांसाठी सर्वाधिक परवडणारी टाटा नॅनो ही होती.

मात्र आता एका कंपनीने एक अप्रतिम कार आणली आहे, जी अगदी कमी किमतीत उपलब्ध असेल आणि तिची रेंज खूप जास्त आहे. जी तुमचा प्रवासात खिसा मोकळा होण्यापासून तुम्हाला वाचवू शकते.

ही कार फर्स्ट ऑटो वर्क्स (FAW) ने आणली आहे. ही कंपनी आता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. आता त्यांनी इलेक्ट्रिक कार लाँच केली असून त्यांनी बेस्ट्युन ब्रँडच्या माध्यमातून ही मायक्रो इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.

या इलेक्ट्रिक कारचे नाव Xiaomi आहे. ही कार जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आली आहे. या कारची किंमत सुमारे 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये असेल. या कारमध्ये 4 जण आरामात बसू शकतील एवढी जागा आहे.

या Xiaomi इलेक्ट्रिक कारमध्ये खूप पॉवरफुल बॅटरी आहे आणि त्यासोबत ही कार एका चार्जवर 1200 किलोमीटरची रेंज देते. या इलेक्ट्रिक कारमध्ये 20 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे.

तसेच या कारमध्ये 7 इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट देण्यात आले असून या कारमध्ये अनेक हायटेक फीचर्स आहेत. मात्र, कंपनीने अद्याप या कारच्या सुरक्षेसंदर्भात विशेष माहिती दिलेली नाही.

मात्र ड्रायव्हर साइड एअरबॅग देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आता ही कार लवकरच भारतात येऊ शकते. त्यामुळे स्वस्तात मस्त आधी ही कार खरेदी करणाऱ्यासाठी ग्राहकांना ही संधी लवकरच मिळणार आहे.