Car & Bike Marathi
Car & Bikes News in Marathi | Latest Auto News in Marathi |ऑटोमोबाइल बातम्या | Latest Cars & Bikes News | New & Upcoming Cars |

XUV 300 Facelift : महिंद्राची जबरदस्त XUV 300 Facelift SUV चाचणी दरम्यान स्पॉट ! पहिल्यापेक्षा होणार हे मोठे बदल

महिंद्रा कार कंपनीकडून त्यांची XUV 300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये सादर केली जाणार आहे. कारमध्ये जबरदस्त फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन पर्याय दिला जाणार आहे.

0

XUV 300 Facelift : देशात एसयूव्ही कार खरेदीचा ट्रेंड सुरु आहे. अनेकजण नवीन कार खरेदी करताना एसयूव्हीचा पर्याय निवडत आहेत. तुम्हालाही नवीन एसयूव्ही कार खरेदी करायची असेल तर जरा थांबा. कारण अनेक नवीन एसयूव्ही कार आगामी काळात लाँच होणार आहेत.

महिंद्रा कार उत्पादक कंपनीच्या XUV 300 एसयूव्ही कारचे फेसलिफ्ट मॉडेल २०२४ मध्ये सादर केले जाणार आहे. ही कार चाचणी दरम्यन स्पॉट झाली आहे. कंपनीकडून या कार्व्हर वेगाने काम सुरु केले आहे.

ADAS मिड स्पेकमध्ये उपलब्ध होणार नाही

महिंद्राच्या XUV 300 एसयूव्ही कारचे facelift मॉडेल २०२४ मध्ये सादर केले जाणार आहे. कारच्या मिड व्हेरियंटमध्ये ADAS फीचर्स दिले जाणार आहे. नवीन XUV 300 फेसलिफ्ट एसयूव्ही कारमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत.

XUV 300 एसयूव्ही फेसलिफ्ट डिझाइन

XUV 300 फेसलिफ्ट कारच्या डिझाईनमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. कारमध्ये नवीन अलॉय व्हील्स देण्यात येणार आहेत. 16 इंच आकर्षक अलॉय व्हील्स देण्यात येतील असा दावा करण्यात येत आहे. कारमध्ये C-आकाराचे LED DRL देण्यात येणार आहेत. कारमध्ये कनेक्ट केलेले एलईडी टेल लाईट डिझाइन दिसत आहे.

XUV 300 एसयूव्ही फेसलिफ्ट इंजिन पॉवरट्रेन

नवीन XUV 300 एसयूव्ही कारमध्ये 1.2L 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5L 4-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिन दिले जाईल. कारमध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय दिले जातील. पहिले पेट्रोल इंजिन 110 bhp पॉवर आणि 200 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल तर दुसरे पेट्रोल इंजिन 129 bhp पॉवर आणि 230 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल.

XUV 300 एसयूव्ही फेसलिफ्ट कारचे इंजिन 6-स्पीड एमटी आणि एएमटी गिअरबॉक्सशी जोडण्यात येईल. कारचे डिझेल इंजिन 115 bhp पॉवर आणि 300 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. डिझेल इंजिनला 6MT आणि 6AMT गिअरबॉक्स पर्याय देण्यात येईल. 2024 मध्ये महिंद्रा त्यांची XUV 300 एसयूव्ही फेसलिफ्ट कार लॉन्च केली जाईल.